१ शमुवेल 20:35-42
१ शमुवेल 20:35-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग असे झाले की, योनाथान सकाळी दावीदाशी नेमेलेल्या वेळी आपल्याबरोबर एक लहान पोर घेऊन रानांत गेला. तो आपल्या पोराला म्हणाला, धाव आता मी बाण मारतो त्याचा शोध कर. पोर धावत असता त्याने त्याच्या पलीकडे बाण मारला. जो बाण योनाथानाने मारला होता त्याच्या ठिकाणावर पोर पोहचला तेव्हा योनाथान पोराच्या मागून हाक मारून बोलला, “बाण तुझ्या पलीकडे आहे की नाही?” योनाथानाने पोराच्या मागून हाक मारली की, “त्वरा कर, धाव, विलंब लावू नको.” तेव्हा योनाथानाचा पोर बाण गोळा करून धन्याकडे आला. मग पोराला काहीच ठाऊक नव्हते योनाथानाला व दावीदाला मात्र गोष्ट ठाऊक होती. योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोराला दिली व त्यास म्हटले, “चल ही उचलून घेऊन नगरात जा.” पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपडा पडला व तीन वेळा नमला; तेव्हा ते एकमेकाचे चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले पण दावीद अधीक रडला. योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा; कारण आपण दोघांनी परमेश्वराच्या नावाने शपथ वाहून म्हटले आहे की माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि माझ्या संतानामध्ये व तुझ्या संतानामध्ये परमेश्वर साक्षी सर्वकाळ असो” मग तो उठून निघून गेला व योनाथान नगरात गेला.
१ शमुवेल 20:35-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सकाळीच योनाथान आपल्याबरोबर एक लहान पोरगा घेऊन मैदानात दाविदाने नेमलेल्या ठिकाणी गेला. तो आपल्या पोराला म्हणाला, “मी बाण सोडतो ते शोधून आण. तो पोरगा धावू लागला तेव्हा त्याने त्याच्या पलीकडे जाईल असा एक बाण सोडला. योनाथानाने सोडलेल्या बाणाच्या टप्प्याजवळ तो पोरगा जाऊन पोहचला तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे आहे ना!” योनाथान त्या पोराला म्हणाला, “त्वरा कर, धाव, विलंब लावू नकोस.” तेव्हा तो योनाथानाचा पोरगा बाण गोळा करून आपल्या धन्याकडे आला. त्या पोराला त्यातले काही कळले नाही; योनाथान व दावीद ह्यांनाच ती गोष्ट माहीत होती. योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोराला देऊन सांगितले की, “ही नगरात घेऊन जा.” तो पोरगा निघून जाताच दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणाकडून उठून आला व त्याने भूमीवर उपडे पडून तीनदा नमन केले; मग एकमेकांचे चुंबन घेऊन ते रडू लागले; दावीद तर मनस्वी रडला. तेव्हा योनाथान दाविदाला म्हणाला, “सुखरूप जा; परमेश्वर तुझ्यामाझ्यामध्ये आणि तुझ्यामाझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो; आपण दोघांनी परमेश्वराच्या नामाने आणभाक केली आहे.” मग तो उठून चालता झाला व योनाथान नगरात गेला.