YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 20:35-42

१ शमुवेल 20:35-42 MARVBSI

सकाळीच योनाथान आपल्याबरोबर एक लहान पोरगा घेऊन मैदानात दाविदाने नेमलेल्या ठिकाणी गेला. तो आपल्या पोराला म्हणाला, “मी बाण सोडतो ते शोधून आण. तो पोरगा धावू लागला तेव्हा त्याने त्याच्या पलीकडे जाईल असा एक बाण सोडला. योनाथानाने सोडलेल्या बाणाच्या टप्प्याजवळ तो पोरगा जाऊन पोहचला तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे आहे ना!” योनाथान त्या पोराला म्हणाला, “त्वरा कर, धाव, विलंब लावू नकोस.” तेव्हा तो योनाथानाचा पोरगा बाण गोळा करून आपल्या धन्याकडे आला. त्या पोराला त्यातले काही कळले नाही; योनाथान व दावीद ह्यांनाच ती गोष्ट माहीत होती. योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोराला देऊन सांगितले की, “ही नगरात घेऊन जा.” तो पोरगा निघून जाताच दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणाकडून उठून आला व त्याने भूमीवर उपडे पडून तीनदा नमन केले; मग एकमेकांचे चुंबन घेऊन ते रडू लागले; दावीद तर मनस्वी रडला. तेव्हा योनाथान दाविदाला म्हणाला, “सुखरूप जा; परमेश्वर तुझ्यामाझ्यामध्ये आणि तुझ्यामाझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो; आपण दोघांनी परमेश्वराच्या नामाने आणभाक केली आहे.” मग तो उठून चालता झाला व योनाथान नगरात गेला.