१ शमुवेल 16:14-23
१ शमुवेल 16:14-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग परमेश्वराच्या आत्म्याने शौलास सोडले आणि देवापासून एक दुष्ट आत्मा त्यास त्रास करू लागला. तेव्हा शौलाचे चाकर त्यास म्हणाले, “आता पाहा देवाकडून एक दुष्ट आत्मा तुम्हास त्रास देतो आहे. आपण विणा वाजविणारा निपुण असा एक पुरुष शोधू. तशी आज्ञा आमच्या धन्याने आपल्यासमोर जे चाकर आहेत त्यास द्यावी. मग जेव्हा देवाकडून दुरात्मा तुम्हास त्रास देऊ लागेल, तेव्हा तो आपल्या हाताने ती वाजवील आणि तुम्हास बरे वाटेल.” मग शौलाने आपल्या चाकरास म्हटले, “जा, चांगला वाजविणारा पुरुष शोधून माझ्याकडे आणा.” मग चाकरातून एका तरूणाने उत्तर दिले की, पाहा वाजविण्यात निपुण, पराक्रमी, लढाऊ पुरुष व उत्तम वक्ता व मनोहर रूपाचा व ज्याला परमेश्वर अनुकूल आहे असा पुरुष मी पहिला आहे, तो इशाय बेथलहेमी ह्याचा पुत्र आहे. मग शौलाने इशायजवळ दूत पाठवून म्हटले की, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत असतो, त्यास मजपाशी पाठवावे.” तेव्हा इशायने भाकरीने लादलेले एक गाढव व द्राक्षरसाचा बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले. दावीद शौलाजवळ येऊन त्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्याची त्याच्यावर फार प्रीती बसली आणि तो त्याचा शस्त्र वाहक झाला. मग शौलाने इशायजवळ निरोप पाठवून सांगितले मी तुला विनंती करतो की, आता दावीदाला माझ्या जवळ राहू दे; कारण त्याच्यावर माझी कृपाद्दष्टी झाली आहे. मग जेव्हा केव्हा देवापासून दुष्ट आत्मा शौलावर येत असे, “तेव्हा दावीदाने विणा घेऊन आपल्या हाताने वाजवी. मग शौल शांत होऊन बरा होई, व तो दुष्ट आत्म्या त्यास सोडून जाई.”
१ शमुवेल 16:14-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इकडे परमेश्वराचा आत्मा शौलाला सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्याला बाधा करू लागला. तेव्हा शौलाच्या सेवकांनी त्याला म्हटले, “पाहा, देवाकडील एक दुरात्मा आपणाला बाधा करीत आहे. तर तंतुवाद्य वाजवण्यात निपुण असा मनुष्य शोधून आणण्याची स्वामींनी आपल्या तैनातीच्या सेवकांना आज्ञा द्यावी; असे केल्यास देवाकडील दुरात्म्याची आपणाला बाधा होईल तेव्हा तो आपल्या हाताने वाद्य वाजवील व आपणाला बरे वाटेल.” ह्यावरून शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एक उत्तम वाद्य वाजवणारा पाहून त्याला माझ्याकडे घेऊन या.” तेव्हा एका तरुण सेवकाने उत्तर दिले, पाहा, मी बेथलेहेमकर इशाय ह्याचा एक पुत्र पाहिला आहे; तो वादनकलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे; आणि परमेश्वर त्याच्याबरोबर आहे.” हे ऐकून शौलाने जासूद पाठवून इशायाला निरोप केला की, “तुझा पुत्र दावीद शेरडेमेंढरे राखत आहे त्याला माझ्याकडे पाठवून दे.” मग इशायाने भाकरींनी लादलेले एक गाढव, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद ह्याच्या हस्ते शौलाकडे पाठवले. दावीद शौलाकडे जाऊन त्याच्या सेवेस हजर राहू लागला; शौल त्याच्यावर फार प्रेम करू लागला व तो त्याचा शस्त्रवाहक झाला. शौलाने इशायाला सांगून पाठवले की, ‘दाविदाला माझ्या तैनातीस राहू दे. कारण माझी त्याच्यावर मर्जी बसली आहे.” जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शौलाला बाधा होई तेव्हा तेव्हा दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवीत असे; मग शौलाला चैन पडून बरे वाटत असे, व तो दुरात्मा त्याला सोडून जात असे.