१ शमुवेल 15:22-23
१ शमुवेल 15:22-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे. कारण बंडखोरी जादुगीरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखा आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.”
१ शमुवेल 15:22-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु शमुवेलने उत्तर दिले: “त्यांच्या आज्ञा पाळल्याने याहवेहला जितका होतो तितका आनंद होमार्पणे व यज्ञांनी होईल काय? यज्ञापेक्षा आज्ञापालन चांगले, आणि एडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. कारण बंडखोरी ही शकुनविद्येच्या पापासारखी आहे, आणि हट्टीपणा मूर्तिपूजेसारखा वाईट आहे. तू याहवेहचे वचन धिक्कारले यामुळे, त्यांनी तुला राजा म्हणून धिक्कारले आहे.”
१ शमुवेल 15:22-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन1 ह्यांसारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे.”