१ राजे 3:1-4
१ राजे 3:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शलमोनाने मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याशी सोयरसंबंध केला; त्याने त्याच्या मुलीशी लग्न करून तिला दावीदपुरास आणले आणि आपले मंदिर, परमेश्वराचे मंदिर व यरुशलेमेच्या सभोवतालची तटबंदी बांधून होईपर्यंत त्याने तिला तेथेच ठेवले. त्या दिवसापर्यंत परमेश्वराच्या नामासाठी मंदिर बांधले नसल्याकारणाने लोकांना उच्च स्थानी यज्ञयाग करावे लागत. शलमोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते; आपला बाप दावीद ह्याने अनुसरलेल्या नियमांप्रमाणे तो चालत असे; पण तो उच्च स्थानी यज्ञयाग करी व धूप जाळीत असे. राजा गिबोन येथे यज्ञ करायला गेला; ते सर्वांत मोठे उच्च स्थान होते; तेथल्या वेदीवर शलमोनाने एक सहस्र होमबली अर्पण केले.
१ राजे 3:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मिसराचा राजा फारो याच्या मुलीशी लग्र करून शलमोनाने फारोशी करार केला. शलमोनाने तिला दावीद नगरात आणले. त्याच्या महालाचे आणि परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम तेव्हा चालू होते. यरूशलेमा सभोवती तटबंदी उभारायचे कामही शलमोनाने हाती घेतले होते. परमेश्वराचे मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात. राजा शलमोनही आपले वडिल दावीद यांनी सांगितलेल्या नियमांचे मन:पूर्वक पालन करून परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. त्या गोष्टीखेरीज यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे. राजा गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली.
१ राजे 3:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शलोमोनने इजिप्तचा राजा फारोह याच्याशी सोयरीक केली व त्याच्या कन्येशी विवाह केला. त्याने तिला दावीदाच्या शहरात आणले आणि आपला राजवाडा, याहवेहचे मंदिर, यरुशलेमच्या सभोवतीचा कोट बांधून होईपर्यंत त्याने तिला तिथेच ठेवले. तथापि लोक अजूनही उच्च स्थानावर आपली यज्ञार्पणे करीत असत. कारण याहवेहच्या नावाचे मंदिर अजून बांधून झाले नव्हते. उच्च स्थानावर जाऊन यज्ञार्पणे करणे व धूप जाळणे, याशिवाय आपला पिता दावीदाने दिलेल्या सूचनांनुसार शलोमोन चालला व त्याने याहवेहवरील त्याची प्रीती व्यक्त केली. राजा गिबोन येथे यज्ञ करावयाला गेले, कारण ते सर्वात महत्त्वाचे उच्च स्थान होते आणि शलोमोनने त्या वेदीवर एक हजार होमार्पणे सादर केली.