१ राजे 19:1-3
१ राजे 19:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहाब राजाने घडलेली सर्व हकिकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले. तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार. यामध्ये मला यश आले नाहीतर देव माझे तसेच व त्याहूनही अधीक करो.” एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैर-शेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून
१ राजे 19:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एलीयाहने जे काही केले आणि त्याने बआलाच्या सर्व संदेष्ट्यांना तलवारीने कसे मारून टाकले ते अहाबाने ईजबेलला सांगितले. तेव्हा ईजबेलने एलीयाहकडे असे म्हणत एक दूत पाठवला, “उद्या या वेळेपर्यंत मी त्यांच्यातील एकाप्रमाणे तुझ्या जिवाचे केले नाही तर देव माझे त्याहूनही अधिक वाईट करो.” एलीयाह घाबरून आपला जीव घेऊन पळून गेला. जेव्हा तो यहूदीया प्रांतातील बेअर-शेबा नगरात आला, त्याने आपल्या सेवकाला तिथे सोडले
१ राजे 19:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एलीयाने काय काय केले, तसेच त्याने सर्व संदेष्टे तलवारीने कसे वधले हे सगळे अहाबाने ईजबेलीला कळवले. तेव्हा ईजबेलीने जासूद पाठवून एलीयाला बजावले की, “संदेष्ट्यांच्या जिवाच्या गतीसारखी तुझ्या जिवाची गती उद्या ह्याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करोत.” हे ऐकून एलीया जीव घेऊन पळाला; तो यहूदातील बैर-शेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकराला ठेवले.