१ राजे 17:3-7
१ राजे 17:3-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे. त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.” तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला. रोज सकाळ संध्याकाळ त्यास कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे. पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ आटला.
१ राजे 17:3-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“येथून निघून पूर्वेकडे जा आणि यार्देनेच्या पूर्वेस केरीथ ओहळाकडे लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तू पी आणि तुला अन्न पुरवावे म्हणून मी कावळ्यांना आज्ञा दिली आहे.” म्हणून याहवेहने त्याला जे सांगितले त्याप्रमाणे त्याने केले. तो पूर्वेला यार्देनेच्या केरीथ ओहळाकडे जाऊन तिथे राहिला. सकाळी आणि संध्याकाळी कावळे त्याच्यासाठी भाकर आणि मांस आणून देत असत आणि तो त्या ओहळाचे पाणी पीत असे. काही काळानंतर ओहोळ आटून गेला, कारण देशात पाऊस नव्हता.
१ राजे 17:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“येथून निघून पूर्व दिशेस जा, व यार्देनेसमोरच्या करीथ ओहळानजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील.” परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देनेसमोरच्या करीथ ओहळानजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळसंध्याकाळ आणून देत, व त्या ओहळाचे पाणी तो पिई. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही.