YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 10:14-29

१ राजे 10:14-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

प्रतिवर्षी शलमोनाकडे सोने येई ते सहाशे सहासष्ट किक्कार भरे; ह्याखेरीज आणखी सौदागर, देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशांचे सुभेदार ह्यांच्याकडून सोने येई ते निराळेच. शलमोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली बनवल्या, एकेका ढालीस सहाशे शेकेल सोने लागले. तसेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून तीनशे लहान ढाली केल्या; प्रत्येक लहान ढालीस तीन माने (शेर) सोने लागले; राजाने ह्या ढाली लबानोन येथील वनगृहात ठेवल्या. राजाने एक मोठे हस्तीदंती सिंहासन बनवले, व ते उत्तम सोन्याने मढवले. सिंहासनाला सहा पायर्‍या होत्या; आसनाचे ओठंगण वरून गोलाकार होते; सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना हात होते व ह्या दोन हातांच्या बाजूंना दोन सिंह केले होते. त्या सहा पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना एकेक असे एकंदर बारा सिंह केले होते; दुसर्‍या कोणत्याही राज्यात ह्यासारखे केलेले सिंहासन नव्हते. शलमोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती; लबानोन येथील वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती; चांदीचे एकही नव्हते; शलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारत नव्हते. समुद्रावर हीरामाच्या जहाजांबरोबर राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत. शलमोन राजा धन व शहाणपण ह्या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजांहून श्रेष्ठ होता. देवाने शलमोनाच्या ठायी शहाणपण ठेवले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरचे लोक त्याच्या दर्शनाला येत. येणारा प्रत्येक जण चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, शस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे ह्यांचा नजराणा वर्षानुवर्ष आणत असे. शलमोनाने रथ व राऊत ह्यांचा संग्रह केला; त्याच्याजवळ चौदाशे रथ व बारा हजार राऊत झाले; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले. राजाने यरुशलेमेत चांदी धोंड्यांप्रमाणे व गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडांप्रमाणे विपुल केले. शलमोनाचे घोडे मिसर देशातून येत; राजाचे व्यापारी घोड्यांच्या एकेका तांड्याची किंमत ठरवून तांडेच्या तांडे घेत; एकेका रथाला सहाशे शेकेल चांदी व एकेका घोड्याला दीडशे शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणत; हित्ती व अरामी राजांसाठीही असेच ते व्यापारी आणत.

सामायिक करा
१ राजे 10 वाचा

१ राजे 10:14-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

शलमोन राजाला दरसाल जवळपास सहाशे सहासष्ट किक्कार सोने मिळत राहिले. या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले. शलमोन राजाने घडीव सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल सोने लागले. तशाच पण जरा लहान तीनशे घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्या लहान ढालीस तीन माने सोने लागले. राजाने या ढाली “लबानोनाचे वन” येथे ठेवल्या. शिवाय राजा शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले होते. सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते. तसेच सहाही पायऱ्यांवर दोन-दोन सिंह होते. असे सिंहासन दुसऱ्या कोणात्याही राज्यात नव्हते. राजा शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनाचे वनामधील” सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती. समुद्रावर राजा हिरामाच्या जहाजांबरोबर शलमोन राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत. शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वाधिक वैभव आणि बुद्धी चातुर्य होते. पृथ्वीवरील सर्व लोक त्यास भेटण्यास उत्सुक असत. देवाने शलमोनाला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे. ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येत. येताना प्रत्येकजण नजराणा आणीत असे. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, सुगंधी मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटीदाखल आणत. शलमोन राजाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे यांचा संग्रह होता. रथासाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यामध्ये रथ ठेवले. काही रथ त्याच्याजवळ यरूशलेमेमध्येही होते. राजाने इस्राएलाला वैभवाच्या शिखरावर नेले. यरूशलेम नगरात चांदी जमीनीवरील दगडधोंड्यासारखी होती आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते. मिसर व सिलीसिया येथून शलमोन घोडे आणत असे. शलमोन राजाचे व्यापारी ते तांडेच्या तांडे खरेदी करत आणि तेथून ते इस्राएलमध्ये आणत. मिसरचा एक रथ साधारण सहाशे शेकेल चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत दिडशे शेकेल चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना हे रथ आणि घोडे नंतर विकत असत.

सामायिक करा
१ राजे 10 वाचा

१ राजे 10:14-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शलोमोनला मिळत जाणारे वार्षिक सोने सहाशे सहासष्ट तालांत होते, याशिवाय व्यापारी आणि सावकार, अरब देशाचे राजे व देशाच्या राज्यपालांपासून येणारी महसूल ती वेगळीच होती. शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल ठोकलेले सोने लागले होते. तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीन मीना सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या. नंतर राजाने हस्तिदंताने सजविलेले एक भव्य सिंहासन तयार करून त्याला शुद्ध सोन्याचे आवरण दिले. सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि त्याच्या मागचा भाग गोलाकार होता. आसनाच्या दोन्ही बाजूंना हात होते आणि दोन्ही हातांच्या बाजूंना दोन सिंह केलेले होते. प्रत्येक पायरीवर दोन याप्रमाणे बारा सिंह केलेले होते. याप्रकारचे सिंहासन आणखी इतर राज्यांमध्ये कुठेही नव्हते. शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे. हीरामच्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा समुद्रावर तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत. संपत्ती व ज्ञानाने शलोमोन राजा पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा अधिक महान होता. परमेश्वराने शलोमोनच्या ठायी दिलेले ज्ञान ऐकण्यास जगातील सर्व लोक येत असत. आणि जे लोक येत असत, ते वर्षानुवर्षे चांदी व सोन्याच्या वस्तू, झगे, शस्त्रे व सुगंधी द्रव्ये व घोडे व खेचरे भेटी म्हणून आणत असत. शलोमोनजवळ रथ व घोडे यांचा साठा झाला; त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे, जे त्याने रथांच्या शहरात व काही यरुशलेमात राजाकडे ठेवली होती. राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले. शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि कवे वरून होत असे; त्यावेळेच्या दरानुसार किंमत लावून राजाचे व्यापारी ते कवेवरून विकत घेत असत. त्यांनी सहाशे शेकेल चांदी देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते पाठवित असत.