शलमोन राजाला दरसाल जवळपास सहाशे सहासष्ट किक्कार सोने मिळत राहिले. या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले. शलमोन राजाने घडीव सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल सोने लागले. तशाच पण जरा लहान तीनशे घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्या लहान ढालीस तीन माने सोने लागले. राजाने या ढाली “लबानोनाचे वन” येथे ठेवल्या. शिवाय राजा शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले होते. सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते. तसेच सहाही पायऱ्यांवर दोन-दोन सिंह होते. असे सिंहासन दुसऱ्या कोणात्याही राज्यात नव्हते. राजा शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनाचे वनामधील” सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती. समुद्रावर राजा हिरामाच्या जहाजांबरोबर शलमोन राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत. शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वाधिक वैभव आणि बुद्धी चातुर्य होते. पृथ्वीवरील सर्व लोक त्यास भेटण्यास उत्सुक असत. देवाने शलमोनाला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे. ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येत. येताना प्रत्येकजण नजराणा आणीत असे. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, सुगंधी मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटीदाखल आणत. शलमोन राजाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे यांचा संग्रह होता. रथासाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यामध्ये रथ ठेवले. काही रथ त्याच्याजवळ यरूशलेमेमध्येही होते. राजाने इस्राएलाला वैभवाच्या शिखरावर नेले. यरूशलेम नगरात चांदी जमीनीवरील दगडधोंड्यासारखी होती आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते. मिसर व सिलीसिया येथून शलमोन घोडे आणत असे. शलमोन राजाचे व्यापारी ते तांडेच्या तांडे खरेदी करत आणि तेथून ते इस्राएलमध्ये आणत. मिसरचा एक रथ साधारण सहाशे शेकेल चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत दिडशे शेकेल चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना हे रथ आणि घोडे नंतर विकत असत.
1 राजे 10 वाचा
ऐका 1 राजे 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 राजे 10:14-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ