1 योहान 3:1-7
1 योहान 3:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्याच्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो; कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हांला माहीत आहे की, आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही. जो कोणी त्याच्या ठायी राहतो तो पाप करत नाही; जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे.
1 योहान 3:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात देव पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोत ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही कारण त्यांनी त्यास ओळखले नाही. प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे आम्हास माहीत नाही. तरीही आम्हास माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्यास पाहू. आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुद्ध आहे, तसा तो आपणाला शुद्ध करतो. प्रत्येकजण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. तुम्हास माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्याठायी पाप नाही. जो कोणी त्याच्याठायी राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करीतो त्याने त्यास पाहिले नाही आणि त्यास ओळखलेही नाही. प्रिय मुलांनो, तुम्हास कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणाराही न्यायसंपन्न आहे.
1 योहान 3:1-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पित्याने आपणावर किती अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे व आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर अगाध प्रीतीचा मोठा वर्षाव केला आहे आणि आपण तसे आहोतच. जग आपल्याला ओळखीत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही. प्रिय मित्रांनो, आपण आता परमेश्वराची मुले आहोत आणि आपण पुढे काय होऊ हे अजून आपल्याला झालेले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा जसे ख्रिस्त आहे तसे आपण होणार, कारण जसे ते आहेत तसेच आपण त्यांना पाहू. ज्यांना त्यांच्यामध्ये अशी आशा आहे ते स्वतःला शुद्ध करतात, जसे ते शुद्ध आहेत. प्रत्येकजण जे पाप करतात ते नियम मोडतात; खरेतर नियमांचे पालन न करणे हे पाप आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे की, आपली पापे दूर करावी म्हणून ख्रिस्त प्रकट झाले. त्यांच्यामध्ये कसलेही पाप नाही. जे कोणी त्यांच्यामध्ये राहतात ते पाप करीत राहत नाही. जे कोणी पाप करीत राहतात त्यांनी ख्रिस्ताला पाहिलेले नाही किंवा त्यांना ओळखले नाही. अहो प्रिय मुलांनो, कोणी तुम्हाला बहकवू नये. जसे ख्रिस्त नीतिमान आहेत, तसेच जे कोणी योग्य ते करतात ते नीतिमान आहेत.
1 योहान 3:1-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला प्रीती हे केवढे दान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने देवाला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ, हे अजून स्पष्ट झालेले नाही, परंतु तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे, तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्यासंबंधाने आशा बाळगतो तो, ख्रिस्त जसा शुद्ध आहे, तसे स्वतःला शुद्ध राखतो. जो कोणी पाप करतो, तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हांला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला आणि त्याच्यामध्ये पाप नाही. जो कोणी त्याच्यामध्ये राहतो, तो पाप करत नाही, जो कोणी पाप करतो, त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये! जसा तो नीतिमान आहे, तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे.