१ करिंथ 4:3-4
१ करिंथ 4:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तुम्हाकडून किंवा कोणा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय व्हावा ही मला लहान गोष्ट वाटत आहे, मी माझा स्वतःचा देखील न्याय करीत नाही. कारण जरी माझा विवेक मला दोष देत नाही तरी त्यामुळे मी निर्दोष ठरतो असे नाही. प्रभू हाच माझा न्यायनिवाडा करणारा आहे.
१ करिंथ 4:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही माझा न्याय केला किंवा कोणत्याही मानवी न्यायालयाने केला; तर मी त्याची जास्त काळजी करत नाही, निश्चित, मी स्वतःचाही न्याय करीत नाही. कारण माझा विवेक शुद्ध असला, तरी मी निर्दोष ठरत नाही. प्रभू माझा न्याय करेल.
१ करिंथ 4:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा, ह्याचे मला काहीच वाटत नाही, मी स्वतःचादेखील न्यायनिवाडा करत नाही. कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे.
१ करिंथ 4:3-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आता तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा, ह्याचे मला महत्त्व वाटत नाही. मी स्वतःचादेखील न्यायनिवाडा करत नाही. माझी सदसद्विवेकबुद्धी शुद्ध असली, तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे.