१ करिंथ 2:4-6
१ करिंथ 2:4-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझे भाषण व घोषणा हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते पण ते आत्मा आणि त्याचे सामर्थ्य यांच्या द्वारे होते. जेणेकरून तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा. तरीपण, जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो परंतु ते ज्ञान या जगाचे नाही आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही.
१ करिंथ 2:4-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझे संदेश व उपदेश ज्ञान किंवा शहाणपणाच्या शब्दाचे नव्हते, तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रमाण देणारे असे होते. यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानांवर आधारलेला असू नये, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर असावा. आम्ही, प्रौढ असलेल्यांना ज्ञानाचा संदेश सांगतो, परंतु हे ज्ञान या युगाचे नव्हे किंवा या युगाचे शासक, ज्यांचे अधःपतन होणार आहे त्यांचेही नव्हे.
१ करिंथ 2:4-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमचा विश्वास मनुयांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणार्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती. तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो; पण ते ज्ञान ह्या युगाचे नाही, आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही.
१ करिंथ 2:4-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर आधारित असावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती तर पवित्र आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती. तथापि तुमच्यात जे अधिक ज्ञानी आहेत, त्यांना मी ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान ह्या युगाचे किंवा ह्या युगाचे नष्ट होणारे जे अधिपती त्यांचेही नव्हे