१ करिंथ 2:15-16
१ करिंथ 2:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. कारण पवित्र शास्त्र म्हणते, “प्रभूचे मन कोण जाणतो? जो त्यास शिकवू शकेल?” परंतु आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.
१ करिंथ 2:15-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आत्मिक असलेल्या माणसाला प्रत्येक गोष्ट पारखता येते, परंतु तो स्वतः मात्र कोणत्याही मानवी न्यायाखाली नसतो. कारण, “प्रभुचे मन कोणाला समजते? त्यांचा सल्लागार कोण आहे?” आपल्याकडे तर ख्रिस्ताचे मन आहे.
१ करिंथ 2:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतपारख कोणाकडूनही होत नाही. “प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे?” अवावे?” आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.
१ करिंथ 2:15-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो आध्यात्मिक आहे, तो सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘प्रभूचे मन कोणी ओळखले आहे की, त्याने त्याला शिकवावे?’ परंतु आपल्याला तर ख्रिस्ताची मनोवृत्ती लाभली आहे.