१ करिंथ 2:14-16
१ करिंथ 2:14-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात. जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. कारण पवित्र शास्त्र म्हणते, “प्रभूचे मन कोण जाणतो? जो त्यास शिकवू शकेल?” परंतु आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.
१ करिंथ 2:14-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जो मनुष्य आत्मिक नाही, तो परमेश्वराच्या आत्म्यापासून आलेल्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात, त्याला त्या समजणार नाहीत, कारण त्या गोष्टी परमेश्वराच्या आत्म्यानेच पारखल्या जाऊ शकतात. आत्मिक असलेल्या माणसाला प्रत्येक गोष्ट पारखता येते, परंतु तो स्वतः मात्र कोणत्याही मानवी न्यायाखाली नसतो. कारण, “प्रभुचे मन कोणाला समजते? त्यांचा सल्लागार कोण आहे?” आपल्याकडे तर ख्रिस्ताचे मन आहे.
१ करिंथ 2:14-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतपारख कोणाकडूनही होत नाही. “प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे?” अवावे?” आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.
१ करिंथ 2:14-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो आध्यात्मिक नाही तो देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्या त्याला समजू शकत नाहीत; कारण त्यांची पारख आध्यात्मिक दृष्टीने होते. जो आध्यात्मिक आहे, तो सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘प्रभूचे मन कोणी ओळखले आहे की, त्याने त्याला शिकवावे?’ परंतु आपल्याला तर ख्रिस्ताची मनोवृत्ती लाभली आहे.