YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 2:1-5

१ करिंथ 2:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो तेव्हा मी देवाविषयीचे सत्य रहस्य मानवी ज्ञानाने किंवा उत्कृष्ट भाषण करून सांगत आलो असे नाही. कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोसुध्दा वधस्तंभावर खिळलेला, याशिवाय कशाचेही ज्ञान मला असू नये असा मी ठाम निश्चय केला आहे. आणि मी तुमच्याकडे अशक्त, भयभीत व थरथर कापत आलो. माझे भाषण व घोषणा हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते पण ते आत्मा आणि त्याचे सामर्थ्य यांच्या द्वारे होते. जेणेकरून तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा.

सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा

१ करिंथ 2:1-5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

बंधुंनो आणि भगिनींनो, माझ्याबाबतीत तसेच झाले, जेव्हा मी तुम्हाकडे आलो, तेव्हा परमेश्वराची साक्ष तुम्हाला सांगण्यासाठी मानवी ज्ञान आणि वक्तृत्व घेऊन आलो नाही. कारण मी असा निश्चय केला होता की तुम्हामध्ये असताना फक्त क्रूसावर खिळलेला येशू ख्रिस्त या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी जाणून घेऊ नये. मी तुमच्याकडे अशक्त, अतिशय भीतभीत व कापत आलो. माझे संदेश व उपदेश ज्ञान किंवा शहाणपणाच्या शब्दाचे नव्हते, तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रमाण देणारे असे होते. यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानांवर आधारलेला असू नये, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर असावा.

सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा

१ करिंथ 2:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बंधुजनहो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हांला सां असे नाही. कारण येशू ख्रिस्त, म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्‍चय केला. आणि मी तअशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुयांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणार्‍या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.

सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा

१ करिंथ 2:1-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

बंधुजनहो, मी तुमच्याकडे आलो, तो वक्‍तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हांला घोषित करण्यास आलो नाही; कारण येशू ख्रिस्त म्हणजे क्रुसावर चढवलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काहीही जमेस धरू नये, असा मी ठाम निश्चय केला होता आणि मी तुमच्याकडे अशक्त, भयभीत व अतिकंपित अवस्थेत आलो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर आधारित असावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती तर पवित्र आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.

सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा