१ करिंथ 14:26-28
१ करिंथ 14:26-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधूंनो मग काय? तुम्ही एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकजण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी अन्य भाषेतून बोलण्यास, तर कोणी अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्वकाही मंडळीच्या उन्नतीसाठी असावे. जर कोणी अन्य भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे, एकावेळी एकानेच बोलावे आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा. जर मंडळीत अर्थ सांगणारा कोणी नसेल तर अन्य भाषा बोलणाऱ्याने सभेत गप्प बसावे, स्वतःशी व देवाशी बोलावे.
१ करिंथ 14:26-28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग बंधुंनो व भगिनींनो, आपण काय म्हणावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, त्यावेळी तुमच्यापैकी प्रत्येकाजवळ असलेले गीत किंवा बोधपर शब्द, किंवा प्रकटीकरण, किंवा अन्य भाषा, किंवा अर्थ सांगण्याची प्रत्येकाची तयारी असावी. या सर्वगोष्टी अशा रीतीने व्हाव्या की ज्याद्वारे मंडळीची उन्नती होईल. कोणी अन्य भाषेत बोलतो, तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन क्रमानुसार, एकजण एकावेळी बोलेल आणि एक अर्थ सांगेल. पण अर्थ सांगणारा उपस्थित नसला, तर अन्य भाषा बोलणार्यांनी मंडळीत शांत राहवे. त्याने स्वतःशी व परमेश्वराशी बोलावे.
१ करिंथ 14:26-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बंधुजनहो, तर मग काय? तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो; सर्वकाही उन्नतीसाठी असावे. अन्य भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावेत; अधिक नसावेत व त्यांनी पाळीपाळीने बोलावे; आणि एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वत:बरोबर व देवाबरोबर बोलावे
१ करिंथ 14:26-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
बंधुजनहो, तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी प्रबोधन करण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी अपरिचित भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही ख्रिस्तमंडळीच्या उभारणीसाठी असावे. अपरिचित भाषा बोलायच्या असल्यास बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावेत, अधिक नसावेत. त्यांनी पाळीपाळीने बोलावे आणि दुसऱ्या एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर अपरिचित भाषा बोलणाऱ्याने ख्रिस्तमंडळीत गप्प राहावे, स्वतःबरोबर व देवाबरोबर बोलावे.