YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथ 14:26-28

1 करिंथ 14:26-28 MACLBSI

बंधुजनहो, तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी प्रबोधन करण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी अपरिचित भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही ख्रिस्तमंडळीच्या उभारणीसाठी असावे. अपरिचित भाषा बोलायच्या असल्यास बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावेत, अधिक नसावेत. त्यांनी पाळीपाळीने बोलावे आणि दुसऱ्या एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर अपरिचित भाषा बोलणाऱ्याने ख्रिस्तमंडळीत गप्प राहावे, स्वतःबरोबर व देवाबरोबर बोलावे.