१ करिंथ 12:9-11
१ करिंथ 12:9-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुसर्याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने, आणखी एकाला चमत्कार करण्याची शक्ती व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ती, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, आणखी एकाला विविध प्रकारच्या भाषा बोलण्याची, आणखी एकाला भाषांतर करून अर्थ सांगण्याची शक्ती दिली आहे. पण या सर्वात तोच एक आत्मा कार्य करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणाला कृपादान वाटून देतो.
१ करिंथ 12:9-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याच आत्म्याद्वारे एकाला विश्वास, तर त्या एका आत्म्याद्वारे दुसर्याला रोग बरे करण्याची दाने मिळतात. तोच आत्मा काही जणांना चमत्कार करण्याचे सामर्थ्य देतो, तर इतर काही जणांना संकल्प सांगण्याचे, तर कित्येकांना आत्मे ओळखण्याचे सामर्थ्य देतो. आणखी काहींना तो अन्य भाषा बोलण्याचे ज्ञान देतो; आणि त्याचप्रमाणे इतरांना अन्य भाषेचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता देतो. ही सर्व कार्ये एक आणि एकच आत्मा करतो आणि आपल्या निर्धारानुसार प्रत्येकाला वाटून देतो.
१ करिंथ 12:9-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एखाद्याला त्याच आत्म्यात4 विश्वास; एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने; एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती; एखाद्याला संदेश देण्याची शक्ती; एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते; तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.
१ करिंथ 12:9-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एखाद्याला त्याच आत्म्याकडून विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्याद्वारे निरोगी करण्याची कृपादाने, अद्भुत कार्य करणे, संदेश देणे, आत्मे ओळखणे, अपरिचित भाषा बोलणे, निरनिराळ्या अपरिचित भाषांचा अर्थ सांगणे ही कृपादाने एकेकाला दिली जातात. ही सर्व कृपादाने देणारा व कार्ये करून घेणारा पवित्र आत्मा एकच आहे; तो आपल्या इच्छेप्रमाणे ती एकेकाला वाटून देतो.