१ करिंथ 12:4-9
१ करिंथ 12:4-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण आत्मा एकच आहे. तसेच सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत पण सर्वात सर्व कार्ये करणारा तो देव एकच आहे. पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे. कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते. दुसर्याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने
१ करिंथ 12:4-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत. आता प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक कल्याणासाठी होते. एकाला आत्म्याद्वारे ज्ञानाचा संदेश, तर तोच दुसर्याला बुद्धिचा संदेश एकाच आत्म्याद्वारे देतो. त्याच आत्म्याद्वारे एकाला विश्वास, तर त्या एका आत्म्याद्वारे दुसर्याला रोग बरे करण्याची दाने मिळतात.
१ करिंथ 12:4-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे; सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभूएकच आहे; आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते; एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन; एखाद्याला त्याच आत्म्यात4 विश्वास; एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने
१ करिंथ 12:4-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु एकच पवित्र आत्मा ती दाने देत असतो. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु त्यांच्याद्वारे एकाच प्रभूची सेवा केली जाते आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. सार्वजनिक हितासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात पवित्र आत्म्याचा अविष्कार होत असतो. एखाद्याला पवित्र आत्म्याद्वारे शहाणपणाचे बोल मिळतात तर दुसऱ्याला त्याच पवित्र आत्म्याकडून विद्येची वाणी दिली जाते. एखाद्याला त्याच आत्म्याकडून विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्याद्वारे निरोगी करण्याची कृपादाने