१ करिंथ 11:2-34
१ करिंथ 11:2-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला सांगून ठेवलेले विधी जसेच्या तसे दृढ धरून पाळता, त्याबद्दल मी तुमची वाहवा करतो. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे अशी माझी इच्छा आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो; तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते. स्त्री जर आपले मस्तक आच्छादत नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावेत, परंतु जर केस कातरून घेणे किंवा मुंडण करणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट आहे तर तिने आपले मस्तक आच्छादावे. पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही; स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे. कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली. पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली. ह्या कारणामुळे देवदूतांकरता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे. तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीच्या द्वारे आहे, आणि सर्वकाही देवापासून आहे. तुम्हीच आपसांत ठरवा; मस्तकावर आच्छादन घेतल्यावाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे असे निसर्गदेखील तुम्हांला सांगत नाही काय? स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे; कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत. तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळ्यांतही नाही. आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. कारण प्रथम हे की, तुम्ही मंडळी ह्या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुमच्यात फुटी असतात असे मी ऐकतो, व ते काही अंशी खरे मानतो; कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस1 उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत. ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. कारण भोजन करतेवेळी प्रत्येक जण आपल्या घरचे जेवण दुसर्यापूर्वी जेवतो; एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. खाणेपिणे करण्यास तुम्हांला आपापली घरे नाहीत की काय? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता काय? मी तुम्हांला काय म्हणू? ह्याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करत नाही. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली; आणि आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “[घ्या, खा,]हे माझे शरीर तुमच्यासाठी [मोडलेले असे] आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.” मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणिम्हटले,“हाप्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.” कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचाप्यालापिईलतोप्रभूचेशरीरवरक्तह्यासंबंधानेदोषीठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो.2 तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत, आणि बरेच निद्रेत आहेत, ह्याचे कारण हेच. आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की, जगाच्याबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. म्हणून माझ्या बंधूनो, तुम्ही भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पाहा. कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, अशा हेतूने की, तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन.
१ करिंथ 11:2-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी तुम्हास नेमून दिलेले विधी, काटेकोरपणे पाळता. परंतु तुम्हास हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे आणि प्रत्येक पुरूष हा स्त्रीचे मस्तक आहे आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे प्रत्येक पुरुष जो प्रार्थना करताना किंवा संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता प्रार्थना करते आणि लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे. जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तर तिने आपले मस्तक झाकावे. ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे. पुरूष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे. आणि पुरूष स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली. ह्याकारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे. तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरूष स्त्रीपासून स्वतंत्र नाही. कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत. हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का? पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हास शिकवीत नाही काय? परंतु स्त्रीने लांब केस राखणे हे तिला गौरव आहे कारण तिला तिचे केस आच्छादनासाठी दिले आहेत. जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रीत नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही. पण आताही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमचे वाईट होते. प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये फुटी असतात आणि काही प्रमाणात त्यावर विश्वास ठेवतो. यासाठी की, जे तुमच्यामध्ये स्वीकृत आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभूभोजन घेत नाही. कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हातील प्रत्येकजण अगोदरच आपले स्वतःचे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा अतीतृप्त झालेला असतो. खाण्यापिण्यासाठी तुम्हास घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजवता? मी तुम्हास काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करू काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करत नाही. कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली, आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.” त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा.” कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल. म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो. याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत आणि काहीजण मरण पावले आहेत. परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. परंतु प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हास शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हासही शिक्षा होऊ नये. म्हणून माझ्या बंधूनो व बहिणींनो जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा. जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही दंड मिळण्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करून देईन.
१ करिंथ 11:2-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्व गोष्टीत तुम्ही माझी आठवण करता म्हणून मी तुमची प्रशंसा करतो व ज्या रूढी मी तुम्हाला सोपवून दिल्या, त्या तुम्ही घट्ट धरून ठेवल्या आहेत. परंतु एक गोष्ट तुम्हाला समजावी अशी माझी इच्छा आहे, प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे आणि प्रत्येक स्त्रीचे मस्तक तिचा पती आहे, ख्रिस्ताचा मस्तक परमेश्वर आहे. जो प्रत्येक पुरुष प्रार्थना करताना किंवा संदेश सांगताना आपल्या डोक्यावर आच्छादन ठेवतो, तो त्याच्या मस्तकाचा अनादर करतो. तसेच जी स्त्री डोक्यावर आच्छादन न घेता प्रार्थना करते किंवा संदेश सांगते, ती आपल्या पतीचा अनादर करते. तसे करणे म्हणजे जणू काय तिने आपल्या डोक्याचे मुंडण केल्यासारखे आहे. एखाद्या स्त्रीला डोक्यावर आच्छादन घेण्याची इच्छा नसेल, तर तिने केस कापावे किंवा मुंडण करावे आणि केस कापणे किंवा मुंडण करणे हे तिला लाजिरवाणे वाटत असेल, तर तिने डोक्यावर आच्छादन घ्यावे. पुरुषाने आपले मस्तक झाकणे योग्य नाही, कारण तो परमेश्वराचे प्रतिरूप व गौरव आहे; परंतु स्त्री पुरुषाचे गौरव आहे. कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही, परंतु स्त्री पुरुषापासून झाली. पुरुष स्त्रीसाठी निर्माण करण्यात आला नव्हता, परंतु स्त्री पुरुषासाठी निर्माण करण्यात आली. या कारणासाठी स्त्रीने आपल्या अधिकाराचे चिन्ह म्हणून देवदूतांकरिता स्वतःचे मस्तक आच्छादावे. प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही आणि पुरुषही स्त्रीपासून स्वतंत्र नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून, त्याचप्रमाणे सर्व पुरुष स्त्रीपासूनच जन्मले, परंतु सर्वकाही परमेश्वरापासून आहे. त्यासंबंधी तुम्हीच निर्णय घ्या: स्त्रीने आपले मस्तक आच्छादून न घेता परमेश्वराची प्रार्थना करणे योग्य आहे काय? निसर्ग आपणास शिकवितो की लांब केस असणे हे पुरुषास लज्जास्पद आहे, परंतु जर स्त्रीचे लांब केस आहेत तर ते तिचे गौरव आहे, कारण आच्छादन म्हणूनच तिला लांब केस दिलेले आहेत. याबाबतीत कोणी वाद घालत असेल, तर आम्हामध्ये आणि परमेश्वराच्या सर्व मंडळ्यांमध्ये इतर रीत प्रचलित नाही. आता खालील गोष्टीबद्दल मला तुमची प्रशंसा करता येत नाही, कारण तुमचे सभेमध्ये एकत्र येणे तुमचे हित करण्यापेक्षा अधिक नुकसानच करते. पहिली गोष्ट अशी की मंडळी म्हणून तुम्ही एकत्र येत असला तरी, तुमच्यात फूट आहे, असे मी ऐकतो आणि त्यावर काही अंशी माझा विश्वास आहे. तुम्हामध्ये मतभेद असणे गरजेचे आहे, म्हणजे परमेश्वराने मान्यता दिलेले कोण आहेत, हे आपोआप उघड होईल. तुम्ही एकत्र येता, तेव्हा ते केवळ प्रभुभोजन खाण्यासाठी नव्हे, जेव्हा तुम्ही भोजन करता, तेव्हा तुमच्यातील काहीजण इतरांचा विचार न करता स्वतःचे भोजन करतात. याचा परिणाम, एकजण उपाशी राहतो व दुसरा द्राक्षारसाने ओतप्रोत भरतो. खाणेपिणे करण्यासाठी तुम्हाला स्वतःची घरे नाहीत काय? किंवा तुम्ही परमेश्वराच्या मंडळीचा अनादर करून ज्यांच्याजवळ काहीच नाही, त्यांना लाजविता काय? मी तुम्हाला काय म्हणावे? मी तुमची प्रशंसा करावी काय? याबाबतीत अजिबात नाही. जे मला प्रभूपासून प्राप्त झाले ते मी तुम्हाला सोपवून दिले आहे: ज्या रात्री प्रभू येशूंचा विश्वासघात करण्यात आला, त्या रात्री त्यांनी भाकर घेतली, आणि आभार मानून ती मोडली आणि ते म्हणाले, “हे माझे शरीर तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.” त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर, प्याला घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे; ज्या ज्यावेळी तुम्ही हा प्याल, त्यावेळी हे माझ्या स्मरणार्थ करा.” कारण ज्यावेळी तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे पुनरागमन होईपर्यंत प्रभूच्या मृत्यूची घोषणा करता. आणि म्हणून, जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खातो किंवा प्रभूचा प्याला पितो, तो प्रभूचे शरीर आणि रक्त याविरुद्ध पाप करतो. याच कारणासाठी ही भाकर खाण्यापूर्वी आणि हा प्याला पिण्यापूर्वी प्रत्येकाने आपले आत्मपरीक्षण करावे. जो ख्रिस्ताचे मंडळीरूपी शरीर न ओळखता अयोग्य प्रकारे ही भाकर खातो आणि हा प्याला पितो, तो स्वतःवर न्याय ओढवून घेतो. म्हणूनच तुमच्यामध्ये अनेकजण दुर्बल व आजारी आहेत, एवढेच नव्हे तर काहीजण मृत्यू पावले आहेत. परंतु जर तुम्ही स्वतःला पडताळून पाहिले असते, तर तुमचा असा न्याय झाला नसता. जरी आपला न्याय प्रभूने अशा रीतीने केला, तरी तुम्हाला शिस्त लागावी, यासाठी की शेवटी जगाबरोबर आपणही दोषी ठरविले जाऊ नये. म्हणूनच, प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही भोजनासाठी एकत्र येता, तेव्हा सर्वजण एकमेकांसाठी थांबून एकत्रित भोजन करा. तुमच्यापैकी कोणी भुकेला असला तर त्याने घरीच काहीतरी खाऊन यावे, यासाठी की जेव्हा तुम्ही एकत्रित जेवता त्यावेळी दंडपात्र होऊ नये. इतर बाबींसंबंधी मी तिकडे आल्यावर पुढील मार्गदर्शन करेन.
१ करिंथ 11:2-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला सांगून ठेवलेले विधी जसेच्या तसे दृढ धरून पाळता, त्याबद्दल मी तुमची वाहवा करतो. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे अशी माझी इच्छा आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो; तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते. स्त्री जर आपले मस्तक आच्छादत नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावेत, परंतु जर केस कातरून घेणे किंवा मुंडण करणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट आहे तर तिने आपले मस्तक आच्छादावे. पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही; स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे. कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली. पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली. ह्या कारणामुळे देवदूतांकरता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे. तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीच्या द्वारे आहे, आणि सर्वकाही देवापासून आहे. तुम्हीच आपसांत ठरवा; मस्तकावर आच्छादन घेतल्यावाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे असे निसर्गदेखील तुम्हांला सांगत नाही काय? स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे; कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत. तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळ्यांतही नाही. आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. कारण प्रथम हे की, तुम्ही मंडळी ह्या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुमच्यात फुटी असतात असे मी ऐकतो, व ते काही अंशी खरे मानतो; कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस1 उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत. ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. कारण भोजन करतेवेळी प्रत्येक जण आपल्या घरचे जेवण दुसर्यापूर्वी जेवतो; एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. खाणेपिणे करण्यास तुम्हांला आपापली घरे नाहीत की काय? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता काय? मी तुम्हांला काय म्हणू? ह्याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करत नाही. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली; आणि आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “[घ्या, खा,]हे माझे शरीर तुमच्यासाठी [मोडलेले असे] आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.” मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणिम्हटले,“हाप्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.” कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचाप्यालापिईलतोप्रभूचेशरीरवरक्तह्यासंबंधानेदोषीठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो.2 तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत, आणि बरेच निद्रेत आहेत, ह्याचे कारण हेच. आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की, जगाच्याबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. म्हणून माझ्या बंधूनो, तुम्ही भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पाहा. कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, अशा हेतूने की, तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन.
१ करिंथ 11:2-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला दिलेली शिकवण तुम्ही दृढ धरून पाळता, ह्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे असी माझी इच्छा आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो, तो आपल्या मस्तकाचा म्हणजे ख्रिस्ताचा अपमान करतो. तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा म्हणजे आपल्या पुरुषाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते. स्त्री जर आपले मस्तक आच्छादीत नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावे, परंतु जर तिला मुंडण करणे लाजिरवाणे वाटते तर तिने आपले मस्तक आच्छादावे. पुरुष म्हणजे देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करण्याची आवश्यकता नाही. परंतु स्त्री ही पुरुषाचे वैभव आहे. कारण पुरुष स्त्रीपासून निर्माण झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली. तसेच पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली. ह्या कारणामुळे स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह म्हणून देवदूतांकरता मस्तकावर आच्छादन धारण करावे. मात्र प्रभूबरोबरच्या आपल्या जीवनात स्त्रीपुरुष परस्परांवर अवलंबून आहेत. कारण जशी स्त्री पुरुषापासून, तसा पुरुष स्त्रीपासून आहे आणि सर्व काही देवाकडून आहे. तुमचे तुम्हीच ठरवा. मस्तकावर आच्छादन घेतल्यावाचून सार्वजनिक उपासनेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे, हे निसर्गदेखील तुम्हांला सांगत नाही काय? स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे. कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत. मात्र जर कोणी वितंडवादी असला तर माझे एवढेच म्हणणे आहे की, आपल्यात आणि देवाच्या ख्रिस्तमंडळ्यांतही दुसरी कोणतीही रीत नाही. आता पुढील आदेश देत असताना मी तुमची वाहवा करीत नाही. प्रार्थनासभेत तुमच्या एकत्र येण्याने तुमचे बरे न होता वाईट होते; कारण पहिल्या प्रथम तुम्ही ख्रिस्तमंडळी ह्या नात्याने एकत्र जमता, तेव्हा तुमच्यामध्ये दुही आहे असे मी ऐकतो व ते काही अंशी खरे मानतो. तुमच्यामध्ये दुही असावी कारण त्या दुहीमुळे खरे कोण आहेत हे उघड होईल. ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता, तेव्हा तुम्ही प्रभुभोजनासाठी येत नाही. कारण भोजनाच्या वेळी प्रत्येक जण आपले घरचे जेवण इतरांपूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो तर दुसरा पिऊन मस्त होतो. खाणेपिणे करण्यास तुम्हांला आपापली घरे नाहीत काय? किंवा तुम्ही देवाच्या ख्रिस्तमंडळीला धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता? याविषयी मी तुम्हांला काय म्हणावे, अशी तुमची अपेक्षा आहे? ह्याबद्दल मी तुमची वाहवा करू काय? नाही. मी तुमची वाहवा करीत नाही! जे मला प्रभूकडून मिळाले, तेच मी तुम्हांला सांगितले आहे, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली. आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा”. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला म्हणजे माझ्या रक्ताने प्रस्थापित झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.” म्हणजेच जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त ह्यासंबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे; कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बल व आजारी आहेत आणि बरेच निधन पावले त्याचे कारण हेच. आपण प्रथम आत्मपरीक्षण केले तर न्यायाचा प्रसंग आपल्यावर ओढवणार नाही. परंतु प्रभू जेव्हा आपला न्याय करतो तेव्हा आपल्याला शिस्त लावली जाते आणि त्यामुळे जगाबरोबर आपल्याला दोषी ठरविण्यात येत नाही. तर मग माझ्या बंधूंनो, तुम्ही प्रभुभोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांसाठी थांबा आणि कोणी भुकेला असला, तर त्याने घरी खावे, म्हणजे तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन.