१ इतिहास 6:54-81
१ इतिहास 6:54-81 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहरोन वंशजांची वस्ती त्यांच्या हद्दीतील किल्ल्याकिल्ल्यांनी ही आहे : कहाथ घराण्याच्या नावाची पहिली चिठ्ठी निघाली म्हणून यहूदा देशातील हेब्रोन त्याच्या शिवारांसह त्यांना दिले; पण त्या नगराची शेतेपोते व खेडीपाडी यफून्नेचा पुत्र कालेब ह्याला दिली. अहरोनाच्या वंशजांना शरणपुरे म्हणून दिली ती ही : हेब्रोन, लिब्ना व त्याचे शिवार, यत्तीर, एष्टमोवा व त्याचे शिवार, हीलेन व त्याचे शिवार, दबीर व त्याचे शिवार, आशान व त्याचे शिवार, बेथशेमेश व त्याचे शिवार, बन्यामिनाच्या वंशाचे गिबा व त्याचे शिवार, अल्लेमेथ व त्याचे शिवार; आणि अनाथोथ व त्याचे शिवार; त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे तेरा होती. अवशिष्ट राहिलेल्या कहाथी वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या मुलखातून दहा नगरे दिली. गेर्षोम वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणारा मनश्शे वंश ह्यांची तेरा नगरे दिली. मरारी वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्या वंशांच्या मुलखातून चिठ्ठ्या टाकून बारा नगरे दिली. इस्राएल लोकांनी लेव्यांना ही नगरे त्यांच्या शिवारांसह दिली. त्यांनी यहूदा, शिमोन व बन्यामीन ह्या वंशांच्या मुलखातून वर सांगितलेली नगरे दिली. कहाथ वंशातील काही कुळांना एफ्राइमाच्या वंशातील मुलखातली नगरे मिळाली ती ही : एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शरणपूर शखेम व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार, यकमाम व त्याचे शिवार, बेथ-होरोन व त्याचे शिवार, अयालोन व त्याचे शिवार, गथ-रिम्मोन व त्याचे शिवार, तसेच मनश्शेच्या अर्ध्या वंशातून आनेर व त्याचे शिवार आणि बिलाम व त्याचे शिवार ही कहाथ वंशातील अवशिष्ट वंशजांना दिली. गेर्षोमाच्या वंशजांना जी नगरे मिळाली ती ही : मनश्शेच्या अर्ध्या वंशातून बाशानातले गोलान व त्याचे शिवार, अष्टारोथ व त्याचे शिवार; इस्साखाराच्या वंशातून केदेश व त्याचे शिवार, दाबरथ व त्याचे शिवार, रामोथ व त्याचे शिवार आणि आनेम व त्याचे शिवार ही दिली; आशेराच्या वंशातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार, हूकोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली; नफताली वंशातून गालीलातले केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली. लेवीच्या बाकीच्या वंशजांना म्हणजे मरारी वंशजांना जी नगरे दिली ती ही : जबुलूनच्या वंशातून रिम्मोनो व त्याचे शिवार आणि ताबोर व त्याचे शिवार; यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन वंशातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, यहसा व त्याचे शिवार, कदेमोथ व त्याचे शिवार आणि मेकाथ व त्याचे शिवार ही दिली; आणि गाद वंशातून गिलादी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार, हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.
१ इतिहास 6:54-81 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली. यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणे त्यांना मिळाली. त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली. अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा, हीलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह. आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली. कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली. गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली. मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली. ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली. यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली. एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली. एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण, यकमाम, बेथ-होरोन, अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली. मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकांस दिली. गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले. त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखाराच्या वंशजांकडून मिळाली. रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह. माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली. हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली. गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोम वंशाला मिळाली. आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली. यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट, कदेमोथ कुरणासकट आणि मेफाथ कुरणासकट दिली. मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट; हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायरानासकट मिळाली.
१ इतिहास 6:54-81 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हा प्रदेश त्यांना वाटप म्हणून देण्यात आला होता. ही त्यांच्या वसाहतींची ठिकाणे बनली. (हा प्रदेश अहरोनाच्या वंशज कोहाथी कुळातील लोकांना देण्यात आला, कारण पहिली चिठ्ठी त्यांच्यासाठी होती): यहूदीयाच्या प्रदेशातील हेब्रोन हे नगर त्याच्या शिवारांसहित दिले. पण त्या नगराची शेते व गावे यफुन्नेहचा पुत्र कालेब याला दिली. अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ, हीलेन, दबीर, आशान, युताह, बेथ-शेमेश सर्व त्यांच्या शिवारासह. बिन्यामीनच्या गोत्रास गिबोन, गेबा, आलेमेथ आणि अनाथोथ ही सर्व त्यांच्या शिवारासह. त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे तेरा होती. अवशिष्ट राहिलेल्या कोहाथी वंशजास चिठ्ठ्या टाकून मनश्शेहच्या अर्ध्या वंशजाच्या प्रदेशातून दहा नगरे दिली. गेर्षोम वंशजास त्यांच्या पितृकुळाप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणाऱ्या मनश्शेह वंशाची तेरा नगरे दिली. मरारी वंशजास चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पितृकुळाप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून या गोत्रांच्या प्रदेशातून बारा नगरे दिली. इस्राएली लोकांनी लेवी वंशजास ही नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली. त्यांनी यहूदाह, शिमओन व बिन्यामीन या वंशांमधून चिठ्ठ्या टाकून आधी उल्लेख केलेली नगरे दिली. एफ्राईम वंशजाने कोहाथ पितृकुळाला जी नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली ती ही: एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर शेखेम (शरणपूर) व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार, योकमेअम, बेथ-होरोन, अय्यालोन, गथ-रिम्मोन हे सर्व त्यांच्या शिवारासह. तसेच मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून आनेर आणि बिलाम, त्यांच्या शिवारासह. ही कोहाथी पितृकुळातील अवशिष्ट वंशजास दिली. गेर्षोमाच्या वंशजास जी नगरे मिळाली ती ही: मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून बाशानातले गोलान व अष्टारोथ त्यांच्या शिवारासह; इस्साखारच्या गोत्रातून केदेश व दाबरथ, रामोथ व त्याचे शिवार आणि आनेम व त्याचे शिवार ही दिली; आशेरच्या गोत्रातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार, हुक्कोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली; नफताली गोत्रातून गालीलातील केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली. लेवीच्या बाकी लोकांना म्हणजे मरारी वंशजास जी शहरे दिली ती ही: जबुलूनाच्या गोत्रातून रिम्मोनो आणि ताबोर त्यांच्या शिवारासह; यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन गोत्रातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, याहसाह व त्याचे शिवार, केदेमोथ व त्याचे शिवार आणि मेफाथ व त्याचे शिवार ही दिली; आणि गाद गोत्रातून गिलआदी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार, हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.