अहरोन वंशजांची वस्ती त्यांच्या हद्दीतील किल्ल्याकिल्ल्यांनी ही आहे : कहाथ घराण्याच्या नावाची पहिली चिठ्ठी निघाली म्हणून
यहूदा देशातील हेब्रोन त्याच्या शिवारांसह त्यांना दिले;
पण त्या नगराची शेतेपोते व खेडीपाडी यफून्नेचा पुत्र कालेब ह्याला दिली.
अहरोनाच्या वंशजांना शरणपुरे म्हणून दिली ती ही : हेब्रोन, लिब्ना व त्याचे शिवार, यत्तीर, एष्टमोवा व त्याचे शिवार,
हीलेन व त्याचे शिवार, दबीर व त्याचे शिवार,
आशान व त्याचे शिवार, बेथशेमेश व त्याचे शिवार,
बन्यामिनाच्या वंशाचे गिबा व त्याचे शिवार, अल्लेमेथ व त्याचे शिवार; आणि अनाथोथ व त्याचे शिवार; त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे तेरा होती.
अवशिष्ट राहिलेल्या कहाथी वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या मुलखातून दहा नगरे दिली.
गेर्षोम वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणारा मनश्शे वंश ह्यांची तेरा नगरे दिली.
मरारी वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्या वंशांच्या मुलखातून चिठ्ठ्या टाकून बारा नगरे दिली.
इस्राएल लोकांनी लेव्यांना ही नगरे त्यांच्या शिवारांसह दिली.
त्यांनी यहूदा, शिमोन व बन्यामीन ह्या वंशांच्या मुलखातून वर सांगितलेली नगरे दिली.
कहाथ वंशातील काही कुळांना एफ्राइमाच्या वंशातील मुलखातली नगरे मिळाली ती ही :
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शरणपूर शखेम व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार,
यकमाम व त्याचे शिवार, बेथ-होरोन व त्याचे शिवार,
अयालोन व त्याचे शिवार, गथ-रिम्मोन व त्याचे शिवार,
तसेच मनश्शेच्या अर्ध्या वंशातून आनेर व त्याचे शिवार आणि बिलाम व त्याचे शिवार ही कहाथ वंशातील अवशिष्ट वंशजांना दिली.
गेर्षोमाच्या वंशजांना जी नगरे मिळाली ती ही : मनश्शेच्या अर्ध्या वंशातून बाशानातले गोलान व त्याचे शिवार, अष्टारोथ व त्याचे शिवार;
इस्साखाराच्या वंशातून केदेश व त्याचे शिवार, दाबरथ व त्याचे शिवार,
रामोथ व त्याचे शिवार आणि आनेम व त्याचे शिवार ही दिली;
आशेराच्या वंशातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार,
हूकोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली;
नफताली वंशातून गालीलातले केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली.
लेवीच्या बाकीच्या वंशजांना म्हणजे मरारी वंशजांना जी नगरे दिली ती ही : जबुलूनच्या वंशातून रिम्मोनो व त्याचे शिवार आणि ताबोर व त्याचे शिवार;
यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन वंशातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, यहसा व त्याचे शिवार,
कदेमोथ व त्याचे शिवार आणि मेकाथ व त्याचे शिवार ही दिली;
आणि गाद वंशातून गिलादी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,
हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.