१ इतिहास 20:2-3
१ इतिहास 20:2-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाने त्या लोकांच्या राजाच्या2 मस्तकांवरून मुकुट काढला; त्याचे वजन एक सोन्याचा किक्कार आहे असे त्याला कळून आले; तो रत्नजडित होता; तो दाविदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली. त्याने त्या नगराच्या रहिवाशांना बाहेर काढून करवती, लोखंडी दाताळी व कुर्हाडी ह्यांनी कापले.3 अम्मोन्यांच्या सर्व नगरांचेही त्याने तसेच केले. मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमास परत आला.
१ इतिहास 20:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीदाने, त्यांच्या राजाच्या डोक्यावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन एक किक्कार होते. तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्यांना त्या नगरातून मोठ्या प्रमाणात पुष्कळ लूट मिळाली. त्या नगरातील लोकांस बाहेर काढून त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, लोखंडी दाताळे या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरूशलेमेला परतले.
१ इतिहास 20:2-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दावीद तिथे पोहोचला, तेव्हा त्याने राब्बाहचा राजा मिलकोम च्या डोक्यावरील मुकुट काढला—तो मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सोन्याचा एक तालांत होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती; तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्याने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली. आणि त्या शहरातील रहिवाशांना त्याने बाहेर आणले व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयाला लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या सर्व नगरांचे असेच केले. नंतर दावीद व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.