दावीद तिथे पोहोचला, तेव्हा त्याने राब्बाहचा राजा मिलकोम च्या डोक्यावरील मुकुट काढला—तो मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सोन्याचा एक तालांत होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती; तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्याने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली. आणि त्या शहरातील रहिवाशांना त्याने बाहेर आणले व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयाला लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या सर्व नगरांचे असेच केले. नंतर दावीद व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.
1 इतिहास 20 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 इतिहास 20:2-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ