१ इतिहास 12:20-22
१ इतिहास 12:20-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो सिक्लाग येथे गेला तेव्हा मनश्शेतले अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, सिलथय हे मनश्शेचे सहस्रपती फितून त्याच्याकडे गेले. त्यांनी लुटारूंच्या टोळीपासून दाविदाचे रक्षण केले; ते सर्व शूर वीर असून सेनानायक होते. दररोज लोक दाविदाची कुमक करण्यासाठी त्याला येऊन मिळत; शेवटी त्याची देवाच्या सेनेसारखी मोठी सेना बनली.
१ इतिहास 12:20-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो जेव्हा सिकलागला गेला. त्याच्याबरोबर आलेले मनश्शेचे लोक अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, आणि सिलथय. हे सर्व मनश्शे वंशातील सरदार होते. लुटारुंच्या टोळीविरुध्द तोंड द्यायला त्यांनी दावीदाला मदत केली. ते लढणारे माणसे होते. दावीदाच्या सैन्यात ते अधिकारपदावर चढले. देवाच्या सैन्यासारखे मोठे सैन्य होईपर्यंत दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत दिवसेंदिवस भर पडत गेली.
१ इतिहास 12:20-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दावीद सिकलाग येथे जात असताना मनश्शेह गोत्रातील जे लोक दावीदाला येऊन मिळाले, त्यांची यादी पुढे दिली आहे: अदनाह, योजाबाद, यदिएल, मिखाएल, यहोजाबाद, एलीहू व सिलथाई. ते सर्वजण मनश्शेह गोत्रातील उच्च श्रेणीचे सहस्त्राधिपती होते. ते शूर योद्धे होते. त्यांनी पलिष्ट्यांच्या गनिमी युद्धाविरुद्ध दावीदाला मदत केली आणि ते त्याच्या सैन्यात सेनाधिकारी होते. दररोज लोक दावीदाला येऊन मिळत होते. शेवटी त्याच्याकडे परमेश्वराच्या सेनेसारखी प्रचंड सेना जमा झाली.