दावीद सिकलाग येथे जात असताना मनश्शेह गोत्रातील जे लोक दावीदाला येऊन मिळाले, त्यांची यादी पुढे दिली आहे: अदनाह, योजाबाद, यदिएल, मिखाएल, यहोजाबाद, एलीहू व सिलथाई. ते सर्वजण मनश्शेह गोत्रातील उच्च श्रेणीचे सहस्त्राधिपती होते. ते शूर योद्धे होते. त्यांनी पलिष्ट्यांच्या गनिमी युद्धाविरुद्ध दावीदाला मदत केली आणि ते त्याच्या सैन्यात सेनाधिकारी होते. दररोज लोक दावीदाला येऊन मिळत होते. शेवटी त्याच्याकडे परमेश्वराच्या सेनेसारखी प्रचंड सेना जमा झाली.
1 इतिहास 12 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 इतिहास 12:20-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ