जखर्याह 5
5
उडत्या चर्मपत्राची गुंडाळी
1मी पुन्हा वर पाहिले आणि उडत असलेली एक चर्मपत्राची गुंडाळी मला दिसली.
2त्या दूताने मला विचारले, “तुला काय दिसते?”
मी उत्तर दिले, “मला एक उडती गुंडाळी दिसते! ती सुमारे वीस हात लांब व दहा हात रुंद#5:2 अंदाजे 9 मीटर लांब व 4.5 मीटर रुंद असावी.”
3मग तो मला म्हणाला, “हा तो शाप आहे, जो या सर्व भूमीवर येणार आहे; चर्मपत्राच्या गुंडाळीच्या एका बाजूस जे लिहिलेले आहे ते असे, देशातून प्रत्येक चोर घालवून दिला जाईल आणि दुसर्या बाजूस म्हटले आहे, जो कोणी शपथ घेऊन खोटे बोलतो, त्या दोषीलाही देशातून घालवून दिले जाईल. 4सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘मी हा शाप पाठवेन, तो प्रत्येक चोराच्या घरात व माझ्या नावाने खोटी शपथ वाहणार्या प्रत्येकाच्या घरात प्रवेश करेल. तो त्या घरावर राहील आणि त्याचे लाकूड व दगडासहित सर्वाचा संपूर्ण नाश करेल.’ ”
टोपलीमधील स्त्री
5मग जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो पुढे आला आणि मला म्हणाला, “वर पाहा आणि बघ काय प्रगट होत आहे.”
6मी विचारले, “ते काय आहे?”
“त्याने उत्तर दिले, ती एक टोपली आहे.” तो पुढे बोलला, “ती संपूर्ण देशातील लोकांची पातके#5:6 किंवा लोकांचा देखावा आहेत.”
7मग तिचे शिसाचे झाकण वर उघडले गेले आणि त्या टोपलीच्या आत बसलेली एक स्त्री मला दिसली! 8याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “ती दुष्टाई आहे.” असे म्हणून त्याने तिला पुन्हा त्या टोपलीत ढकलले आणि त्या टोपलीचे शिसाचे झाकण बंद केले.
9मग मी वर बघितले—आणि मला दोन स्त्रिया उडतांना दिसल्या, त्यांच्या पंखात वारा भरलेला होता! त्यांचे पंख करकोचाच्या पंखांप्रमाणे होते आणि त्यांनी ती टोपली आकाश व पृथ्वीच्या मध्ये उचलली.
10तेव्हा जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता त्याला मी विचारले, “ती टोपली त्या कुठे नेत आहेत?”
11त्याने उत्तर दिले, “शिनार#5:11 किंवा बाबिलोन देशात, तिच्याकरिता घर बांधण्यासाठी. जेव्हा घर तयार होईल, तेव्हा ही टोपली त्यामध्ये तिच्या ठिकाणी ठेवण्यात येईल.”
सध्या निवडलेले:
जखर्याह 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.