YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 9:9-21

रोमकरांस 9:9-21 MRCV

कारण अशा रीतीने वचन दिले होते: “ठरलेल्या वेळी मी परतेन त्यावेळी सारेला पुत्र होईल.” एवढेच नव्हे, परंतु रिबेकाच्या लेकरांचीही एकाच वेळी आपला बाप इसहाक यांच्याद्वारे गर्भधारणा झाली होती. जुळ्या मुलांचा जन्म होण्याअगोदर, किंवा चांगले वाईट करण्याअगोदर; परमेश्वराचा उद्देश निवडीसंबंधाने कायम राहावा. कृत्याने नव्हे तर पाचारण देणार्‍याने असे रिबेकाला सांगितले होते, “मोठा लहान्याची सेवा करील.” जसे शास्त्रलेखात लिहिले आहे: “मी याकोबावर प्रीती केली, परंतु एसावाचा द्वेष केला.” तर मग आपण काय म्हणावे? परमेश्वर अन्यायी आहे का? नक्कीच नाही. कारण ते मोशेला म्हणाले: “ज्या कोणावर मला दया करावयाची असेल, त्यांच्यावर मी दया करेन आणि ज्यांच्यावर करुणा करावयाची माझी इच्छा आहे, त्यांच्यावर मी करुणा करेन.” हे मानवी इच्छेने किंवा प्रयत्नांनी नव्हे, तर परमेश्वराच्या दयेवर अवलंबून आहे. शास्त्रलेख फारोला सांगते: “तुला उभे करण्यात माझा एकमात्र उद्देश हा होता, की माझे सामर्थ्य तुझ्यामध्ये प्रकट व्हावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.” यास्तव ज्यांच्यावर दया करावी असे परमेश्वराला वाटते, त्यांच्यावर ते दया करतात व ज्याला कठोर करावे त्यांना ते कठोर करतात. तुमच्यापैकी काही मला म्हणतील: “परमेश्वर आम्हाला दोष का लावतात? त्यांच्या इच्छेला विरोध कोण करणार?” मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? “घडलेल्या वस्तुने ती घडविणार्‍याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ ” कुंभाराला एकाच मातीच्या गोळयातून एक पात्र विशेष उद्देशासाठी व दुसरे सर्वसामान्य उद्देशासाठी घडविण्याचा अधिकार नाही काय?

रोमकरांस 9 वाचा