YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 3:23-27

रोमकरांस 3:23-27 MRCV

कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत, आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामूल्य नीतिमान म्हणून जाहीर केले आहे. ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताने विश्वासाद्वारे प्रायश्चिताचा यज्ञ व्हावा म्हणून परमेश्वराने त्यांना प्रस्तुत केले. यासाठी की मागे केलेल्या आपल्या पापांसाठी त्यांच्या सहनशीलतेमुळे दंड मिळू नये, तर त्यांचे नीतिमत्व प्रगट व्हावे. आता सध्याच्या काळात देखील ते आपले नीतिमत्व प्रकट करीत आहेत, यासाठी की त्यांनी स्वतःवर आणि येशूंवर विश्वास ठेवणार्‍यांना नीतिमान म्हणून घोषित करावे. तर मग आमचा गर्व कशासाठी? तो वगळण्यात आला आहे. कोणत्या नियमानुसार? नियमाला कर्माची जोड हवी का? नाही, नियमाला विश्वासाची गरज आहे.