YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 10:9-13

रोमकरांस 10:9-13 MRCV

“येशू प्रभू आहे,” असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल. कारण तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवल्यानेच तुम्ही नीतिमान ठरता; आणि आपल्या मुखाने इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगितले की तारण होते. शास्त्रलेख म्हणते, “जो कोणी प्रभू येशूंवर विश्वास ठेवितो तो कधीही लज्जित होणार नाही.” यहूदी व गैरयहूदी यामध्ये फरक नाही; त्या सर्वांचा एकच प्रभू आहे आणि जे त्यांचा धावा करतात त्या सर्वांना ते विपुल आशीर्वाद देतात, परंतु, “जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.”