YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 10:13-17

रोमकरांस 10:13-17 MRCV

परंतु, “जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.” ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर ते त्याचा धावा कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलेच नाही, तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवतील? आणि कोणी त्यांना संदेश सांगितलाच नाही, तर ते कसे ऐकतील? आणि कोणाला पाठविल्यावाचून ते संदेश कसा सांगतील? कारण असे लिखित आहे: “शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत!” परंतु शुभवार्ता सर्वच इस्राएल लोकांनी स्वीकारली नाही. यशायाह म्हणतो, “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?” तरीपण, संदेश ऐकल्यानेच विश्वास प्राप्त होतो, आणि ख्रिस्ताचा संदेश, वचन ऐकल्यामुळे प्राप्त होतो.