YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटीकरण 22:3-10

प्रकटीकरण 22:3-10 MRCV

तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्‍याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील. ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल. तिथे रात्र असणार नाही, दिव्यांची किंवा सूर्यप्रकाशाची तिथे गरज पडणार नाही, कारण प्रत्यक्ष प्रभू परमेश्वरच त्यांचा प्रकाश होतील आणि ते युगानुयुग राज्य करतील. नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना अंतःस्फूर्ती देणाऱ्या प्रभू परमेश्वरांनी ज्यागोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्यांच्या सेवकांना कळविण्यासाठी त्यांच्या दूताला पाठविले आहे.” “पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचनाचे पालन करतो तो धन्य.” मी, योहानाने या सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्या आणि ज्या देवदूताने मला त्या दाखविल्या, त्याला नमन करण्यासाठी मी त्याच्या पायांवर उपडा पडलो. परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. तू परमेश्वराची आराधना कर.” नंतर त्याने मला सांगितले, “या पुस्तकातील भविष्यकथनाचे शब्द शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे.