पृथ्वी उलथीपालथी झाली आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले, सागरांच्या जलांनी गर्जना केल्या, आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. सेला आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते; तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात. परमेश्वर स्वतः त्या नगरीत राहतात; ती नगरी अढळ राहील; प्रभात होताच परमेश्वर साहाय्य करतील. राष्ट्रे खवळली, राज्ये कोलमडली; त्यांच्या मोठ्या गर्जनेने पृथ्वी विरघळून जाते. सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत; याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला
स्तोत्रसंहिता 46 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 46:2-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ