YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 137

137
स्तोत्र 137
1आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि
सीयोनाची आठवण करीत रडलो.
2आम्ही आमच्या वीणा
वाळुंजाच्या फांद्यावर टांगल्या,
3कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले,
आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली,
ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”
4या परदेशात आमच्या याहवेहचे
स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?
5हे यरुशलेम, मी तुला विसरलो,
तर माझा उजवा हात त्याचे कौशल्य विसरो;
6जर मी यरुशलेमला माझा
सर्वोच्च आनंद मानत नसेन,
तर माझी जीभ
माझ्या टाळूला चिकटो.
7हे याहवेह, माझ्या देवा, यरुशलेमचा पाडाव झाला
त्या दिवशी एदोमाच्या वंशजांनी काय केले याचे स्मरण करा.
ते आरोळ्या मारत होते, “तिला जमीनदोस्त करा,
तिचा पाया देखील ढासळून टाका.”
8अगे बाबेलच्या कन्ये, तुझा नाश निश्चित आहे;
तू जसा आमचा नाश केलास,
तसा तुझी परतफेड करणारा धन्य होईल.
9जो तुझी तान्ही बालके घेऊन,
त्यांना खडकावर आपटेल, तो धन्य!

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 137: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन