YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 2:12-20

नीतिसूत्रे 2:12-20 MRCV

सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील. ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी सरळपणाच्या वाटा सोडून दिल्या आहेत, ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो आणि दुष्टांच्या कुटिलपणात जे उल्हासतात, ज्यांचे मार्ग विकृत आहेत आणि ज्यांच्या वाटा विपरीत आहेत! सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्‍या स्त्रीपासून, जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे, आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे. निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात. तिच्याकडे जाणारा परत येत नाही किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही. यासाठी तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालशील, आणि नीतिमानांच्या मार्गांचे अवलंबन करशील.

नीतिसूत्रे 2 वाचा