YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 12:15-28

नीतिसूत्रे 12:15-28 MRCV

मूर्खाच्या दृष्टीने त्याचाच मार्ग योग्य असतो; परंतु जो शहाणा असतो, तो सल्ला ऐकतो. मूर्ख आपला क्रोध तत्काळ दर्शवितो, परंतु सुज्ञ मनुष्य अपमानाकडे दुर्लक्ष करतो. प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो, परंतु खोटा साक्षीदार लबाड बोलतो. निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो, पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते. सत्याची वाणी काळाच्या कसोटीला उतरते; लबाड जिव्हा ही क्षणिक आहे. दुष्ट योजना करणार्‍यांच्या हृदयात कपट असते, पण शांतीची मसलत देणार्‍यांच्या हृदयात आनंद असतो. न्यायी मनुष्यावर काहीही आपत्ती येणार नाही, परंतु दुष्ट लोक आपत्तींनी व्याप्त होतात. असत्य बोलणार्‍या ओठांची याहवेह घृणा करतात, परंतु विश्वसनीय लोक त्यांना प्रसन्न करतात. सुज्ञ मनुष्य आपले ज्ञान प्रकट करीत नाही, परंतु मूर्खाचे हृदय मूर्खपणाचे प्रसरण करतात. उद्योगी मनुष्यांचे हात सत्ता धारण करतील, पण आळशी लोकांना गुलामगिरी प्राप्त होईल. चिंता हृदयावर दबाव आणते, परंतु कोमल शब्द ते आनंदित करते. नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो. आळशी मनुष्याला शिकार मिळत नाही, परंतु उद्योगी मनुष्याला भरपूर मिळकत प्राप्त होते. नीतिमानाचा मार्ग जीवनाकडे जातो, व त्याच मार्गामधून अमरत्व मिळते.

नीतिसूत्रे 12 वाचा