दयाळू अंतःकरणाची स्त्री सन्मान संपादन करते, परंतु क्रूर पुरुष केवळ धन संपादन करतो. दयाळू मनुष्य स्वतःचे भले करतो, परंतु क्रूर माणसे स्वतःवर नाश ओढवून घेतात. दुष्ट मनुष्याला मिळणारे वेतन फसवे असते; परंतु जो नीतिमत्तेचे बीज पेरतो त्याला निश्चितच बक्षीस मिळते. खरोखरच नीतिमानाला जीवन प्राप्त होते, परंतु दुष्कर्मांच्या मागे लागणारा मृत्यू ओढवून घेतो. याहवेह विकृत अंतःकरणाच्या लोकांचा तिरस्कार करतात, परंतु निर्दोष मार्गाने चालणारे त्यांना प्रसन्न करतात. याची खात्री असू दे: दुष्टाला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, परंतु जे नीतिमान आहेत त्यांची सुटका होईल. विवेकहीन सुंदर स्त्री जणू डुकराच्या नाकातील सोन्याची नथच समजावी. नीतिमानाच्या इच्छेचा परिणाम चांगलाच असतो, परंतु दुष्टाची आशा केवळ प्रक्रोपच आणते. एक मनुष्य सढळ हाताने देतो, तरी देखील तो समृद्ध होतो, दुसरा मनुष्य दान देणे उगाच नाकारतो आणि तो दरिद्री बनतो. उदार मनुष्याची समृद्ध होईल; आणि जो दुसर्याला प्रोत्साहित करतो, तो स्वतः प्रोत्साहित होईल. जो धान्य अडवून ठेवतो, त्याला लोक शाप देतात, परंतु जो विकण्यास इच्छुक असतो, त्याच्यासाठी लोक आशीर्वादाची प्रार्थना करतात. जो चांगल्या गोष्टींचा शोध घेतो त्याला कृपा प्राप्त होते, परंतु जो वाईटाचा शोध घेतो त्याला तेच प्राप्त होते. जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील, परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल. जो कोणी त्याच्या कुटुंबाचा नाश करतो, त्याला वारसा म्हणून केवळ वारा मिळेल, आणि मूर्खाला शहाण्याचा दास व्हावे लागेल. नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो सुज्ञ आहे तो आत्मे जिंकतो. जर नीतिमान लोकांना पृथ्वीवरच प्रतिफळ मिळते, तर मग अनीतिमान व पापी लोकांना किती मोठ्या प्रमाणात मिळेल!
नीतिसूत्रे 11 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 11:16-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ