YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 8:1-14

गणना 8:1-14 MRCV

मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाशी बोल व त्याला सांग, जेव्हा तू दिवे लावशील, तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्या पुढील बाजूस पडावा.” याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच अहरोनाने केले; त्याने दीपस्तंभाच्या समोरील बाजूस दिवे लावले. दीपस्तंभ अशाप्रकारे घडविला गेला होता: जसे याहवेहने मोशेला दाखविले होते त्या नमुन्याप्रमाणेच तो त्याच्या बैठकीपासून त्याच्या फुलांपर्यंत सोन्याने घडविला होता. याहवेह मोशेला म्हणाले, “लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून घेऊन त्यांना विधीनुसार शुद्ध कर. त्यांना शुद्ध करण्यासाठी तू असे कर: त्यांच्यावर शुद्धीकरणाचे पाणी शिंपडावे; मग त्यांनी आपल्या संपूर्ण अंगावरून वस्तरा फिरवावा व आपले कपडे धुवावे. अशाप्रकारे ते स्वतःला शुद्ध करतील. मग त्यांनी एक गोर्‍हा घ्यावा व त्याबरोबरचे अन्नार्पण जे जैतुनाच्या तेलात मळलेले सपीठ आणावे; आणि पापार्पणासाठी आणखी एक गोर्‍हा आणावा. लेव्यांना सभामंडपाच्या समोर घेऊन यावे व सर्व इस्राएल समुदायाला एकत्र करावे. लेव्यांना याहवेहपुढे सादर करावे व इस्राएली लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत. अहरोनाने इस्राएली लोकांच्या वतीने हेलावणीचे अर्पण म्हणून लेव्यांना याहवेहसमोर सादर करावे, म्हणजे ते याहवेहची सेवा करण्याकरिता तयार होतील.” मग लेव्यांनी गोर्‍ह्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत, त्यातील एक गोर्‍हा याहवेहला पापार्पण म्हणून अर्पण करावा आणि दुसरा लेव्यांसाठी प्रायश्चित म्हणून होमार्पण करावा. मग तू लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांसमोर उभे करावे आणि त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहला सादर करावे. अशाप्रकारे तू लेवी लोकांना माझ्यासाठी इतर इस्राएली लोकांपासून वेगळे करावेस म्हणजे लेवी माझे होतील.

गणना 8 वाचा