YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 25

25
मोआब इस्राएलला फितवितो
1इस्राएली लोक शिट्टीम येथे राहत असताना, त्यांचे पुरुष तेथील मोआबी कन्यांशी व्यभिचार करू लागले, 2त्या कन्यांनी इस्राएली पुरुषांना त्यांच्या दैवतांच्या यज्ञास बोलाविले. लोकांनी त्या यज्ञांचे भोजन खाल्ले आणि त्या दैवतांना नमन केले. 3अशा प्रकारे इस्राएली लोक बआल-पौराशी जडले आणि याहवेहचा कोप त्यांच्याविरुद्ध भडकला.
4याहवेहने मोशेला म्हटले, “या लोकांच्या सर्व पुढार्‍यांना घे, त्यांना फासावर टांग व त्यांना दिवसाच्या प्रकाशात याहवेहसमोर उघडे कर, म्हणजे इस्राएलवर पेटलेला याहवेहचा क्रोध शांत होईल.”
5तेव्हा मोशे इस्राएलच्या न्यायाधीशांनी म्हणाला, “तुम्ही स्वतःला बआल-पौराशी जोडले आहे, तुम्हा प्रत्येकाला जिवे मारावे.”
6त्यावेळी ते सभामंडपाच्या दारात रडत असताना, एका इस्राएली पुरुषाने मोशे व संपूर्ण इस्राएली मंडळीसमोर एक मिद्यानी स्त्री आणली. 7जेव्हा अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने हे पाहिले, तेव्हा तो समुदायातून उठला व त्याने आपल्या हाती एक भाला घेतला 8आणि त्यांच्यामागे तंबूत गेला व त्या दोघांच्या म्हणजेच तो इस्राएली पुरुष व ती स्त्री यांच्या पोटात तो भाला भोसकला, तेव्हा इस्राएलच्या लोकांमधून पीडा थांबली; 9परंतु त्या पीडेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांची संख्या चोवीस हजार होती.
10मग याहवेह मोशेला म्हणाले, 11“अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने इस्राएलवरील माझा क्रोध शांत केला आहे. कारण लोकांमधील माझ्या सन्मानाविषयी मी जितका ईर्ष्यावान आहे तितकाच तो सुद्धा होता म्हणून मी माझ्या ईर्षेने त्यांचा नाश केला नाही. 12म्हणून त्याला सांग मी त्याच्याशी शांतीचा करार करीत आहे. 13तो व त्याच्या वंशजासाठी हा सर्वकाळच्या याजकपणाचा करार असणार, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या सन्मानासंबंधी ईर्ष्यावान होता आणि इस्राएली लोकांसाठी त्याने प्रायश्चित केले.”
14मिद्यानी स्त्रीबरोबर ज्या इस्राएली पुरुषाला जिवे मारण्यात आले, त्याचे नाव जिम्री होते, जो शिमओनी घराण्याचा पुढारी सालूचा पुत्र होता. 15आणि ज्या मिद्यानी स्त्रीला जिवे मारण्यात आले होते तिचे नाव कजबी होते, जी मिद्यानी घराण्याच्या कुळाचा पुढारी सूरची कन्या होती.
16याहवेह मोशेला म्हणाले, 17“मिद्यानी लोकांना शत्रू समजून त्यांना जिवे मारा. 18कारण त्यांनी तुम्हाला शत्रू मानले, जेव्हा पेओरच्या घटनेत तुम्हाला फसविण्यासाठी आपली बहीण, मिद्यानी पुढार्‍याची मुलगी कजबी हिचा त्यांनी उपयोग केला व त्या घटनेमुळे पीडा आली, तेव्हा तिला जिवे मारण्यात आले.”

सध्या निवडलेले:

गणना 25: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन