YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 2

2
गोत्राच्या डेर्‍यांची व्यवस्था
1याहवेहने मोशे आणि अहरोनाला म्हटले: 2“इस्राएली लोकांनी सभामंडपाच्या सभोवती, त्यापासून थोडे अंतरावर आपआपले डेरे उभारावे, प्रत्येकाने ते आपआपल्या झेंड्याजवळ व आपल्या घराण्याच्या निशाणाजवळ ते उभारावे.”
3पूर्वेकडे, सूर्योदयाच्या दिशेने:
यहूदाहच्या छावणीच्या दलांनी त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. यहूदाहच्या लोकांचा पुढारी अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा. 4त्यांच्या दलातील लोकांची संख्या 74,600 होती.
5इस्साखारचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देणार. इस्साखारच्या लोकांचा पुढारी सूवाराचा मुलगा नथानेल असावा. 6त्यांच्या दलातील लोकांची संख्या 54,400 होती.
7त्यानंतर जबुलूनचे गोत्र असणार. हेलोनचा पुत्र एलियाब हा जबुलूनच्या लोकांचा पुढारी आहे. 8त्यांच्या दलातील लोकांची संख्या 57,400 होती.
9यहूदाहच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार, संख्येने 1,86,400 होते. त्यांनी सर्वप्रथम निघावे.
10दक्षिणेच्या बाजूस:
रऊबेनच्या छावणीच्या दलाने त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा असावा. रऊबेनच्या लोकांचा पुढारी शेदेऊरचा पुत्र एलीसूर आहे. 11त्यांच्या दलातील लोकांची संख्या 46,500 होती.
12शिमओनचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. शिमओनच्या लोकांचा पुढारी सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल आहे. 13त्यांच्या दलातील लोकांची संख्या 59,300 होती.
14त्यानंतर गाद गोत्र असेल. गादच्या लोकांचा पुढारी रऊएलाचा पुत्र एलीआसाफ आहे. 15त्यांच्या दलातील लोकांची संख्या 45,650 होती.
16रऊबेनच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,51,450 होते. ते दुसर्‍या रांगेत निघतील.
17मग सभामंडप व लेव्यांची छावणी सर्व छावण्यांच्या मध्यभागी असणार. ज्या क्रमाने ते डेरा देऊन राहतात त्याच क्रमाने, आपल्या झेंड्याखाली आपआपल्या जागेवर त्यांनी निघावे.
18पश्चिमेच्या बाजूस:
एफ्राईमच्या दलाने आपल्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. एफ्राईमच्या लोकांचा पुढारी अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा आहे. 19त्यांच्या दलातील लोकांची संख्या 40,500 होती.
20मनश्शेहचे गोत्र त्यांच्यानंतर असेल. मनश्शेहच्या लोकांचा पुढारी पदहसूरचा पुत्र गमलीएल आहे. 21त्यांच्या दलातील लोकांची संख्या 32,200 होती.
22त्यानंतर बिन्यामीनचे गोत्र असणार. बिन्यामीन लोकांचा पुढारी गिदयोनीचा पुत्र अबीदान आहे. 23त्यांच्या दलातील लोकांची संख्या 35,400 होती.
24एफ्राईमच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,08,100 होते. ते तिसर्‍या रांगेत निघतील.
25उत्तरेच्या बाजूस:
दानच्या दलाने आपल्या झेंड्याखाली त्यांचा डेरा द्यावा. दान लोकांचा पुढारी अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर आहे. 26त्यांच्या दलातील लोकांची संख्या 62,700 होती.
27आशेर गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. आशेर लोकांचा पुढारी ओक्रानचा पुत्र पगीयेल आहे. 28त्यांच्या दलातील लोकांची संख्या 41,500 होती.
29नफताली गोत्र त्यांच्या शेजारी असणार. नफताली लोकांचा पुढारी एनानाचा पुत्र अहीरा आहे. 30त्यांच्या दलातील लोकांची संख्या 53,400 होती.
31दानच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,57,600 होते. त्यांच्या झेंड्याखाली ते सर्वांच्या शेवटी निघतील.
32आपआपल्या घराण्यानुसार मोजलेले इस्राएली लोक हे आहेत. छावणीतील सर्व पुरुषांची संख्या 6,03,550 होती. 33याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इतर इस्राएल लोकांबरोबर लेव्यांची मोजणी केली नव्हती.
34अशा रीतीने याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी प्रत्येक गोष्ट केली, ते असे की, आपआपल्या झेंड्याजवळ ते डेरे देत असत आणि आपले कूळ व घराणे यानुसार पुढे चालत असत.

सध्या निवडलेले:

गणना 2: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन