YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 7:1-8

मार्क 7:1-8 MRCV

परूशी आणि यरुशलेम नगरातून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंच्या भोवती गोळा झाले. येशूंचे काही शिष्य अशुद्ध हाताने, म्हणजे हात न धुताच जेवतात, असे त्यांनी पाहिले होते. परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडिलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत. ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत. या कारणामुळे परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूंना विचारले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडिलांच्या परंपरा प्रमाणे का वागत नाहीत व ते आपले हात अशुद्ध असताना का जेवतात?” यावर येशूंनी उत्तर दिले, “यशया संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; तो म्हणतो: “ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची हृदये माझ्यापासून फार दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण हे केवळ मनुष्यांनी केलेले नियमच असतात.’ तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.”

मार्क 7 वाचा

मार्क 7:1-8 साठी चलचित्र