मार्क 12:41, 42, 43, 44
मार्क 12:41 MRCV
येशू दानपात्रासमोर बसले आणि समुदाय मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान कसे टाकतात हे लक्षपूर्वक पाहत होते. पुष्कळ धनवान लोकांनी पुष्कळ दान टाकले.
मार्क 12:42 MRCV
मग एक गरीब विधवा आली आणि या गरीब विधवेला तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना त्यांनी पाहिले, ज्याची किंमत फक्त एक पैसा होती.
मार्क 12:43 MRCV
ते पाहून येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक दान पात्रात टाकले आहे.
मार्क 12:44 MRCV
कारण त्या सर्वांनी आपल्या संपत्तीतून थोडेसे दिले, पण हिने तर आपल्या गरीबीतून सर्व उपजीविका देऊन टाकली.”