“मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. “तुम्हामध्ये असा कोण आहे जर तुमच्या मुलाने भाकर मागितली, तर त्याला दगड देईल? किंवा मासा मागितला, तर साप देईल? जर तुम्ही वाईट असूनही तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते चांगल्या देणग्या किती विशेषकरून देतील? तर मग सर्व ज्या इतरांनी तुमच्यासाठी कराव्यात तसेच तुम्हीही त्यांच्यासाठी करा, नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे सार हेच आहे.
मत्तय 7 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 7:7-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ