“धन्य आहेत ते, जे आत्म्याने नम्र आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल. धन्य आहेत ते, जे सौम्य आहेत, कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील. धन्य आहेत ते, ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे, कारण ते तृप्त केले जातील. धन्य ते, जे दयाळू आहेत, कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल. धन्य आहेत ते, जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत, कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल. धन्य आहेत ते, जे शांती प्रस्थापित करतात, कारण ते परमेश्वराची मुले म्हटले जातील. धन्य आहेत ते, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ करण्यात येतो, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. “माझे अनुयायी असल्यामुळे लोक तुमची निंदा, तुमचा अपमान व छळ करतील व तुमच्याविरुद्ध सर्वप्रकारच्या गोष्टी लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. तुम्ही आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांनी प्राचीन काळाच्या संदेष्ट्यांनाही असेच छळले होते.
मत्तय 5 वाचा
ऐका मत्तय 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 5:3-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ