पवित्र आत्म्याने भरलेल्या येशूंनी यार्देन सोडले, आणि आत्म्याने त्यांना अरण्यात नेले, तेथे चाळीस दिवस सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. या दिवसांमध्ये त्यांनी काही खाल्ले नाही आणि ते संपल्यानंतर त्यांना भूक लागली. सैतान येशूंना म्हणाला, “जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग.” पण येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीनेच जगत नाही.’ ” नंतर सैतानाने येशूंना एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली. आणि सैतानाने त्यांना म्हटले, “मी तुला या सर्वांवर अधिकार व वैभव देईन; कारण ती मला देण्यात आली आहेत आणि ज्याला पाहिजे त्याला मी देऊ शकतो. जर तू माझी उपासना करशील, तर हे सगळे तुझेच होईल.” येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझा परमेश्वर यांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ” मग सैतानाने त्याला यरुशलेमास नेऊन मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक,” कारण असे लिहिले आहे: “ ‘तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल तुझे रक्षण काळजीपूर्वक करण्यासंबंधाने; ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील, म्हणजे तुझ्या पायाला दगडाची ठेच लागणार नाही.’ ” येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्वर त्यांची परीक्षा पाहू नको.’ ” या सर्व परीक्षा संपल्यानंतर, योग्य संधी मिळेपर्यंत सैतान त्यांना सोडून निघून गेला. यानंतर पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरलेले येशू गालील प्रांतात परतले आणि त्यांची किर्ती चहूकडील सर्व प्रांतात पसरली.
लूक 4 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 4:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ