एके दिवशी येशू एका ठिकाणी प्रार्थना करीत होते. प्रार्थना संपल्यावर त्यांच्या शिष्यांपैकी एकाने त्यांना म्हटले, “प्रभूजी, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकविले, त्याप्रमाणे तुम्हीही आम्हास शिकवा.” येशूंनी शिष्यांना सांगितले, “अशा रीतीने प्रार्थना करा: “ ‘हे पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो; तुमचे राज्य येवो. आमची रोजची भाकर प्रतिदिनी आम्हाला द्या. कारण जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो; तशी तुम्ही आमच्या पापांची क्षमा करा आम्हास परीक्षेत आणू नका.’ ” येशू त्यांना म्हणाले, “समजा तुमचा एक मित्र आहे, मध्यरात्री तुम्ही त्याच्याकडे जाऊन म्हणता, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; माझा मित्र प्रवास करून घरी आला आहे, पण त्याला वाढण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही.’ समजा तुमचा मित्र आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नको. दार बंद झाले आहे आणि मी व माझी मुले अंथरुणात आहोत आणि आता मी उठून तुला काही देऊ शकत नाही.’ परंतु मी तुम्हाला सांगतो की, जरी मैत्रीमुळे तो उठून त्याला भाकर देणार नाही, तरी तुमच्या आग्रहामुळे तो नक्कीच उठेल आणि जितकी तुमची गरज आहे तितके तो तुम्हाला देईल. “मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो, त्याच्यासाठी दार उघडले जाईल. “तुमच्यातील कोण असे वडील आहेत, जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल?
लूक 11 वाचा
ऐका लूक 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 11:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ