YouVersion लोगो
सर्च आयकॉन

विलापगीत 3:13-27

विलापगीत 3:13-27 MRCV

आणि त्यांच्या भात्यातील बाणांनी माझे अंतर्याम छेदले आहे. मी माझ्या लोकांच्या उपहासाचा विषय झालो आहे; ते दिवसभर माझ्या चेष्टेची गीते गातात. प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे, आणि मला आंब प्यावयास दिली आहे. त्यांनी माझे दात खड्यांनी पाडले आहेत. त्यांनी मला धुळीत तुडविले आहे. माझी शांती हिरावून गेली आहे; समृद्धी म्हणजे काय असते हे मी विसरलो आहे. म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे व याहवेहकडून काहीही मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.” माझी पीडा व भटकंतीची, विषारी वनस्पती व कडू दवणा यांची मला आठवण येते. ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे, आणि त्याने माझा आत्मा अत्यंत खिन्न होतो. तरीपण आशेचा हा एक किरण उरला आहे: याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही. त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते; तुमची विश्वसनीयता महान आहे. मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत; म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.” जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत. याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे हितकारक आहे. मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे त्याच्या हितासाठी आहे.

विलापगीत 3 वाचा