YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशुआ 15

15
यहूदाहला देण्यात आलेला प्रदेश
1यहूदाह गोत्रास त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकून देण्यात आलेला प्रदेश एदोमाच्या सीमेपर्यंत आणि सीनच्या वाळवंटातील दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला होता.
2त्यांची दक्षिण सीमा मृत समुद्राच्या दक्षिणेस असलेल्या शेवटच्या खाडीपासून सुरू झाली, 3अक्राब्बीमच्या चढावाच्या दक्षिणेस असलेल्या मार्गाने सीन रानाच्या कडेने जाऊन दक्षिणेस कादेश-बरनेआपर्यंत. नंतर ती हेस्रोनच्या पुढे अद्दारपर्यंत आणि कारकाला वळण घेते. 4नंतर पुढे जाऊन ती आजमोनच्या बाजूने इजिप्तच्या ओढ्यापर्यंत जाऊन, त्या ओढ्याच्या कडेने ती भूमध्य समुद्रापर्यंत गेली होती. ही त्यांची दक्षिणी सीमा आहे.
5त्यांची पूर्वेकडील सीमा यार्देन नदीच्या मुखाकडे असलेल्या मृत समुद्रापर्यंत होती.
त्यांच्या उत्तरेकडील सीमेची सुरुवात यार्देनेच्या मुखाशी असलेल्या खाडीपासून झाली, 6व पुढे बेथ-होगलाहपर्यंत चढून बेथ-अराबाहच्या उत्तरेकडे रऊबेनाचा पुत्र बोहनच्या खडकापर्यंत गेली. 7तिथून ती सीमा आखोर खोर्‍यापासून दबीरपर्यंत जाऊन गिलगालच्या उत्तरेकडे वळली. हे गिलगाल खोर्‍याच्या दक्षिण बाजूस असलेल्या अदुमिम्माच्या चढावांच्या समोरील बाजूस आहे. तिथून त्या सीमेचा विस्तार एन-शेमेशच्या झर्‍यांपासून एन-रोगेलपर्यंत होता. 8त्यानंतर ती सीमा हिन्नोमाच्या खोर्‍यातून जाऊन यबूसी नगराच्या (म्हणजे यरुशलेम) दक्षिणेकडील बाजूने गेली. पुढे ती सीमा पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्‍यासमोर आणि रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेकडील टोकास असलेल्या पर्वताच्या माथ्यावर जाऊन पोहोचली. 9तिथून ती सीमा त्या डोंगराच्या माथ्यापासून नेफतोआहच्या झर्‍यापर्यंत आणि तिथून एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून बालाह म्हणजेच किर्याथ-यआरीमपर्यंत पोहोचते. 10तिथून ती बालाहाच्या पश्चिमेस वळसा घेऊन सेईर पर्वताकडे गेली आणि यआरीम म्हणजेच कसालोन डोंगराच्या उत्तरेस जाऊन बेथ-शेमेश इथे उतरून तिम्नाहास जाऊन पोहोचते. 11तिथून ती एक्रोनच्या उत्तरेकडून शिक्रोनपर्यंत गेली व बालाह पर्वतावरून यबनेलास जाऊन पोहोचली. सीमेचा शेवट भूमध्य समुद्राजवळ झाला.
12भूमध्य समुद्राचा किनारा ही पश्चिमेची सीमा होती.
यहूदाह कुळातील लोकांच्या त्यांच्या वंशानुसार हा प्रदेश मिळाला.
13आणि यहोशुआने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे यफुन्नेहचा पुत्र कालेबाला यहूदाहच्या कुळाबरोबर जो वाटा दिला तो हा: किर्याथ-अर्बा म्हणजेच हेब्रोन. (अर्बा हा अनाकांचा पूर्वज होता.) 14अनाकाचे पुत्र शेशय, अहीमान व तलमय या अनाकांच्या वंशजांना कालेबाने बाहेर घालवून दिले. 15तिथून त्यांनी दबीरमध्ये (पूर्वी दबीरचे नाव किर्याथ-सेफर होते) राहणार्‍या लोकांवर हल्ला केला. 16आणि कालेब म्हणाला, “जो पुरुष किर्याथ-सेफरवर स्वारी करून ते हस्तगत करेल, त्याला मी आपली कन्या अक्साह ही पत्नी म्हणून देईन.” 17कालेबाचा भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलाने ते जिंकून घेतले, म्हणून कालेबाने आपली कन्या अक्साह त्याला पत्नी म्हणून दिली.
18एक दिवस जेव्हा ती ओथनिएलकडे आली, तेव्हा तिने तिच्या वडिलांना एक शेत देण्याची त्याला विनंती केली. जेव्हा ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे?”
19तिने उत्तर दिले, “माझ्यावर विशेष कृपा करा. तुम्ही मला नेगेव प्रांतात जमीन दिलेली आहेच, मला पाण्याचे झरेही द्या.” म्हणून कालेबाने तिला वरचे आणि खालचे झरे दिले.
20यहूदाह गोत्रास त्यांच्या कुळानुसार आलेले वतन हे होते:
21दक्षिण भागाची नगरे यहूदाह गोत्राची जी नेगेव प्रांताकडे एदोमाच्या सीमेजवळ होती:
कबसेल, एदर, यागूर, 22कीनाह, दीमोनाह, अदआदाह, 23केदेश, हासोर, इथनान, 24जीफ, तेलेम, बालोथ, 25हासोर-हदत्ताह, करीयोथ हेस्रोन (हेच हासोर), 26अमाम, शमा, मोलादाह, 27हसर-गदाह, हेशमोन, बेथ-पेलेट, 28हसर-शुआल, बेअर-शेबा, बिजोथा, 29बालाह, ईयीम, असेम, 30एलतोलाद, कसील, होरमाह, 31सिकलाग, मदमन्नाह, सनसन्नाह, 32लबाओथ, शिलहीम, एईन व रिम्मोन. ही सर्व मिळून एकोणतीस नगरे आणि त्यांची गावे होती.
33पश्चिम तळवटीत वसलेली नगरे ही:
एष्टाओल, सोराह, अशनाह, 34जानोहा, एन-गन्नीम, तप्पूआह, एनाम, 35यर्मूथ, अदुल्लाम, सोकोह, अजेकाह, 36शाराईम, अदीथयिम, व गेदेराह#15:36 किंवा गदेरोथाईम ही एकूण चौदा नगरे व त्यांची गावे होती.
37सेनान, हदाशाह, मिगदल-गाद, 38दिलआन, मिस्पेह, योकथएल, 39लाखीश, बसकाथ, एग्लोन, 40कब्बोन, लहमास, किथलीश, 41गदेरोथ, बेथ-दागोन, नामाह व मक्केदा अशी सोळा नगरे आणि त्यांची गावे.
42लिब्नाह, एथेर, आशान, 43इफ्ताह, अशनाह, नेजीब, 44कईलाह, अकजीब, आणि मारेशाह अशी नऊ नगरे आणि त्यांची गावे.
45एक्रोन व सभोवतालच्या वस्त्या व गावे. 46एक्रोनच्या पश्चिमेपासून अश्दोदच्या परिसरात असलेल्या गावांसहीत सर्वकाही; 47अश्दोद व त्याच्या सभोवतालच्या वस्त्या व गावे, गाझा, त्याच्या वस्त्या व गावे, इजिप्तच्या नाल्यापर्यंतची गावे व भूमध्य समुद्राच्या काठापर्यंत.
48डोंगराळ प्रदेशातील:
शामीर, यत्तीर सोकोह, 49दन्नाह किर्याथ-सन्नाह; म्हणजेच दबीर, 50अनाब, एष्तमोह, अनीम, 51गोशेन, होलोन, आणि गिलोह अशी अकरा नगरे आणि त्यांची गावे.
52अरब, दूमाह#15:52 किंवा रुमाह, एशआन, 53यानीम, बेथ-तप्पूआह, अफेकाह, 54हुमताह, किर्याथ-अर्बा; म्हणजेच हेब्रोन आणि सियोर अशी नऊ नगरे आणि त्यांची गावे.
55माओन, कर्मेल, जीफ, युत्ताह, 56येज्रील, योकदेआम, जानोहा, 57काईन, गिबियाह, तिम्नाह अशी दहा नगरे आणि त्यांची गावे.
58हल्हूल, बेथ-सूर, गदोर, 59माराथ, बेथ-अनोथ व एलतेकोन अशी सहा नगरे आणि त्यांची गावे.
60किर्याथ-बआल (म्हणजेच किर्याथ-यआरीम व राब्बाह) अशी दोन नगरे आणि त्यांची गावे.
61अरण्यातील नगरे ही:
बेथ-अराबाह, मिद्दीन, सकाकाह, 62मिठाचे नगर निबशान आणि एन-गेदी अशी सहा नगरे आणि त्यांची गावे.
63परंतु यरुशलेम शहरात राहणार्‍या यबूसी लोकांना यहूदाह वंशातील लोक घालवून देऊ शकले नाहीत; आजही यबूसी लोक यरुशलेममध्ये यहूदीयाच्या लोकांमध्ये राहात आहेत.

सध्या निवडलेले:

यहोशुआ 15: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन