YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योना 3

3
योनाह निनवेस जातो
1मग याहवेहचे वचन दुसऱ्या वेळेस योनाहकडे आले: 2“ऊठ, त्या महान निनवेह शहरात जा आणि मी जो संदेश तुला देत आहे त्याची घोषणा कर.”
3तेव्हा योनाहने याहवेहच्या वचनाप्रमाणे केले आणि निनवेह शहरास गेला. आता निनवेह हे फारच मोठे शहर#3:3 फारच मोठे शहर मूळ भाषेत परमेश्वरासाठी एक महान शहर होते. ते पार करण्यास तीन दिवस लागत होते. 4जेव्हा योनाहने शहरात एक दिवसाचा प्रवास सुरू केला आणि घोषणा केली, “आतापासून चाळीस दिवसांनी निनवेहचा नाश होईल.” 5तेव्हा निनवेहच्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. सर्वत्र उपवास जाहीर केला आणि त्या सर्वांनी, मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांनी गोणपाट परिधान केले.
6जेव्हा योनाहची चेतावणी निनवेहच्या राजापर्यंत पोहोचली, तेव्हा तो आपल्या सिंहासनावरून उठला, आपली राजवस्त्रे काढून बाजूला ठेवली व गोणपाट परिधान करून तो राखेत जाऊन बसला. 7त्याने निनवेहमध्ये ही घोषणा केली:
“राजा आणि त्याच्या सरदारांच्या आदेशानुसार:
“कोणत्याही मनुष्याने किंवा पशूने, गुरे किंवा मेंढरांनी, काहीही चाखू नये; त्यांनी काहीही खाऊ किंवा पिऊ नये. 8पण मनुष्याने आणि प्राण्याने गोणपाट घालावे. प्रत्येकाने त्वरित परमेश्वराचा धावा केला करावा आणि आपली वाईट कृत्ये आणि हिंसाचार सोडावा. 9कोण जाणो? परमेश्वर दया करतील आणि त्यांची इच्छा बदलू शकेल आणि त्यांचा तीव्र क्रोध शांत होईल आणि आपण विनाशापासून वाचू.”
10जेव्हा परमेश्वराने पाहिले, त्यांनी काय केले आणि आपल्या दुष्ट मार्गांपासून कसे फिरले आहेत, तेव्हा त्यांनी आपली इच्छा बदलली आणि त्यांनी ठरविलेला नाश त्यांच्यावर आणला नाही.

सध्या निवडलेले:

योना 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन