इय्योब 37
37
1“हे ऐकून माझे हृदय धडधडते
ते आपल्याच ठिकाणी झेप घेते.
2ऐका! परमेश्वराच्या डरकाळीचा आवाज ऐका,
ती गर्जना जी त्यांच्या मुखातून येते.
3संपूर्ण आकाशाच्या खालून ते लखलखीत वीज मोकळी सोडतात
आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठवितात.
4त्यानंतर त्यांच्या डरकाळीचा आवाज येतो;
त्यांच्या राजेशाही आवाजात ते गडगडतात.
जेव्हा त्यांचा आवाज सगळीकडे घुमतो,
तेव्हा ते काहीही मागे धरून ठेवीत नाहीत.
5परमेश्वराची वाणी आश्चर्यकारकरित्या गर्जना करते;
आमच्या बुद्धीपलीकडील महान कार्य ते करतात.
6हिमास, ‘तू पृथ्वीवर पड,’
आणि पावसाच्या सरींना, ‘मुसळधार वृष्टी होवो’ असे सांगतात.
7त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येकाने परमेश्वराचे कार्य ओळखावे,
म्हणून ते सर्व लोकांचे कामकाज बंद करतात.
8वनपशू लपून राहतात;
अथवा त्यांच्या गुहांमध्येच राहतात.
9त्यांच्या भवनामधून तुफान येते,
आणि वादळी वार्यातून थंडी येते.
10परमेश्वराचा श्वास बर्फ तयार करते,
आणि मोठ्या पाण्याचा प्रवाह गोठून जातो.
11ते मेघांना दहिवराने भरून टाकतात;
आणि त्यातूनच त्यांची लखलखीत वीज पसरवितात.
12परमेश्वर जे काही त्यांना मार्गदर्शन करून सांगतात
ते संपूर्ण पृथ्वीवर करण्यासाठी
त्यांच्या दिशेने ते चोहीकडे फिरतात.
13लोकांना शासन करावे म्हणून,
किंवा पृथ्वीला पाणी देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करावे म्हणून ते मेघ आणतात.
14“हे इय्योबा, लक्षपूर्वक ऐक;
थांब आणि परमेश्वराची आश्चर्यकर्मे समजून घे.
15परमेश्वर मेघांवर कसे नियंत्रण करतात
आणि त्यांची वीज कशी चमकवितात हे तुला माहीत आहे का?
16मेघ शांत कसे होतात हे तुला माहीत आहे का
त्यांच्या त्या अद्भुत कृत्यांचे परिपूर्ण ज्ञान कोणाला आहे?
17जेव्हा तुझ्या वस्त्रांमध्ये तुला घाम फुटतो
आणि दक्षिणेच्या वार्यामुळे भूमी स्तब्ध होते,
18आकाश जे साच्यात असलेल्या कास्य आरशाप्रमाणे आहे,
ते परमेश्वराबरोबर तू पसरवशील काय?
19“आपण त्यांच्याशी काय बोलावे ते आम्हाला सांग;
आपल्या अंधकारामुळे आपला वाद आपण त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही.
20मला बोलायचे आहे असे त्यांना सांगावे काय?
आपणास गिळून टाकावे म्हणून कोणी विचारतील काय?
21आता सूर्याकडे कोणीही बघू शकत नाही,
तो आकाशांमध्ये किती प्रखर आहे
वार्याने त्या मेघांना साफ पुसून टाकले आहे.
22उत्तरेकडून ते सोनेरी वैभवाने येत आहे;
होय, परमेश्वर अप्रतिम ऐश्वर्याने येत आहेत.
23सर्वसमर्थ आमच्या आवाक्याच्या बाहेर आहेत आणि ते सामर्थ्याने उन्नत आहेत;
त्यांच्या न्यायात आणि महान नीतिमत्वात ते जुलूम करीत नाही.
24म्हणून लोक त्यांची श्रद्धा बाळगतात,
कारण जे सर्व हृदयाने ज्ञानी आहेत त्यांच्याप्रती परमेश्वराला आदर नाही काय?”
सध्या निवडलेले:
इय्योब 37: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.